घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजि नं १८१/२०२४ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा शोध घेणेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप फुलपगारे स्वारगेट पोलीस स्टेशन यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते.

 

त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप घुले, सुजय पवार व अनिस शेख यांनी गुन्हयाचे घटनास्थळाचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन संशयित आरोपीचा शोध घेत असतान यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील संशयित आरोपी धोबीघाट परिसरामध्ये आला आहे अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन पाहणी केली असता संशयित आरोपी दिसुन आल्याने तो पळुन जाण्याचे तयारीत असताना त्याला घेराव घालुन ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने दोन गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याने आरोपी नामे शाहरुख सल्लाऊद्दीन खतीब वय २२ वर्षे रा. भाग्योदयनगर गल्ली नं १२ कोंढवा पुणे यास अटक करुन तपासादरम्यान त्यांचेकडुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या ०२ गुन्हयामधील चोरीस गेलेल्या एकुण ५०,०००/- रु किंमतीचा एक मोबाईल व सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले एकुण ०२ गुन्हे उघड केले आहेत ते पुढीलप्रमाणे –
१) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं १८१/२०२४ भादंवि कलम ४५४, ३८० प्रमाणे २) स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं -६९/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे

Advertisement

सदरची कामगिरी ही मा.श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. प्रविण पवार साो, सह-आयुक्त साो, पुणे शहर, मा.श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, पुणे शहर, मा.नंदिनी वग्यानी साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. दिलीप फुलपगारे, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मा.गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पो/अं १०१४७ संदीप घुले, पो/अं १००५७ सुजय पवार, पो/अं ९८२० अनिस शेख, पो/अं १००१६ शिवा गायकवाड, पो/अं ७८९९ हर्षल शिंदे, पो/अं १००६२ फिरोज शेख, पो/अं ९९६३ दिपक खंदाड, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अं ३५४१ प्रविण गोडसे, यांनी एकत्र मिळुन केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!