गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात; गुटखा, पान मसाल्यासह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; उरुळीतील एकावर गुन्हा दाखल


पत्रकार:- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण 

उरुळी कांचन पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- उरुळी कांचनसह परिसरात गुटख्याची अवैध वाहतूक करणारा टेम्पो उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रविवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गावच्या हद्दीतील दत्तवाडी परिसरातील संदीप सुभाश कांचन यांच्या राहत्या घराजवळ, आडोशाला ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी एका टेम्पोसह १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी टेम्पोचा मालक समीर जयसिंग कांचन (रा. जय मल्हार रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार रमेश सोमनाथ भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत गुटख्याची वाहतूक करणारे वाहन जाणार असल्याची माहिती उरुळी कांचन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचून टेम्पो व त्याच्या चालकाला ताब्यात घेतले. या वेळी वाहनांची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यानुसार बेकायदा गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोसह सुमारे १३ लाख ८१ हजार १३८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!