महाळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीसांची धडाकेबाज कामगिरी जबरी चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना अटक करुन एक देशी पिस्तुल व तीन काडतुस केली जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

महाळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने अवैध्द रित्या शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर कारवाई करणेकामी सुचना व मार्गदर्शन केलेले आहे. दिनांक २२/०३/२०२४ रोजी ०६/३० वाजताचे दरम्यान कामगार नामे प्रविण देवराव भंडारवाड हा भाजीपाला आणण्यासाठी आपले रुमवरुन खालुंब्रे बाजारपेठ येथे पायी चालत जात असताना त्यास खालुंब्रे गावतील पाण्याच्या टाकीजवळ आल्यावर अचानक इसम नामे निखिल बोत्रे व बफन लांगडे हे तेथे आले. त्यांनी प्रविन भंडारवाड यास आडवुन तुझ्या खिशातील पैसे आम्हाला दे असे बोलले. त्यावेळी प्रविण भंडारवाड हा माझ्याकडे पैसे नाहीत असे बोलल्यानंतर निखिल बोत्रे त्यास म्हणाला की, तु मला ओळखत नाहीस का, असे बोलुन त्या दोघांनी त्यास हाताने मारहाण करुन त्याचे वरच्या खिश्यातील १५००/- रुपये बळजबरीने काढुन घेतले. त्यावेळी प्रविण भंडारवाड याने आरडाओरडा केल्याने आजुबाजुचे लोक त्याचे मदतीला आले असता निखिल बोत्रे याने त्याचे खिश्यातुन एक देशी पिस्तुल काढले व प्रविण भंडारवाड याचे मदतीसाठी आलेल्या लोकांना दाखवुन म्हणाला तुम्ही जर पुढे आले तर मी तुम्हास जिवे मारीन असे बोलला असता, जमा झालेले लोक तेथुन घाबरुन पळुन गेले. त्यानंतर ते दोघेही प्रविण भंडारवाड यास, तु घडला प्रकार जर कोणाला सांगितला तर तुला आम्ही जिवे ठार मारुन टाकु असे बोलुन ते तेथुन पळुन गेले. म्हणुन इसम नामे प्रविण भंडारवाड याने निखिल बोत्रे व बफन लांडगे यांचे विरुध्द कायदेशिर तक्रार दिल्याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं.१६३/२०२४ भा.द.वि.क.३९४,५०६,३४ शस्त्र अधिनियम ३ (२५), क्रिमिनल लॉ अमेटर्मेन्ट ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

दाखल गुन्हयाचा तपास मा. वरीष्ठांच्या सुचनेप्रमाणे श्री नितिन गिते, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली केला असता, आरोपी यांचा शोध घेणेकामी तात्काळ रवाना होवुन गुप्तबातमीदारा मार्फत बातमी काढुन आरोपी नामे निखिल बोत्रे हा खालुंबे गावात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेण्यात आले त्यावेळी त्याचेकडे एक देशी पिस्तुल व तीन काडतुस व १५००/- रुपये रोख रक्कम मिळुन आल्याने ती जप्त करण्यात आले असुन निखिल नंदु बोत्रे रा. मौजे खालुंब्रे ता. खेड जि. पुणे यास अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचा साथिदार नामे प्रशांत ऊर्फ बफन धर्मा लांडगे रा. खराबवाडी ता. खेड जि पुणे यास देखिल गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.

 

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सोो, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, श्री शिवाजी पवार सोो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, श्री राजेंद्रसिंग गौर साो, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितिन गिते, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संतोष कसबे, पोलीस उप निरीक्षक, किरण शिंदे, जितेंद्र गिरनार, पो. हवा. राजेंद्र कोणकेरी, अमोल बोराटे, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, युवराज बिराजदार, प्रकाश चाफळे, राजु जाधव पोना संतोष काळे, किशोर सांगळे, पवण वाजे पोकों / शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, गणेश गायकवाड, अमोल माटे, संतोष वायकर, मंगेश कदम, शेखर खराडे, अमोल वेताळ, मपोशि / सुप्रिया शिंदे यांनी केली आहे.

दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि, जितेंद्र गिरनार, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!