येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी ! मकोका अंतर्गत फरार आरोपीस पाठलाग करुन केले जेरबंद


जोसेफ नडेसन पुणे प्रतिनिधी
येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महापोलीस न्यूज ऑनलाइन पुणे :-  येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.४३६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८ (२) (३) (५) सह भारतीय हत्यार कायदा ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (ब), १३५. क्रिमीनल लॉअमेंडमेंट ३, ७. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ३(१) (२), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी हे मकोका अंतर्गत कारवाई झालेनंतर फरार झाले होते. सदर बाबत आरोपींना तात्काळ ताब्यात घेणेबाबत मा. वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार शैलेश वाबळे यांनी आरोपीचा वापरता मोबाईल क्रमांक मिळवून त्याचे आधारे व सदरचा आरोपी हा वारंवार मोबाईल क्रमांक, वास्तव्य व ओळख लपवुन वावरत असल्याने तसेच श्रेणी पोलीस उप निरीक्षक प्रदिप सुर्वे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील आरोपी पुणे सोलापुर रोड मार्गे मुळ गावी पळुन जाण्याचे तयारीत आहे.
सदरबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाचे सहप्रभारी श्रेणी पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार जायभाय, कांबळे, शिंदे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन संशयित इसमावर पाळत ठेवली असता आरोपी हा खाजगी ट्रॅव्हल्स मधुन गावी जात असल्याबाबत माहिती मिळाताच त्याबाबत खातरजमा करुन गाडीचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अजय युवराज कसबे, वय-२४, रा-भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. नमुद आरोपीस पुढील करावाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आणले असुन पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, हे करत आहेत.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४. श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक ( गुन्हे), श्री. विजय ठाकर, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोउनि महेश फटांगरे, सहप्रभारी श्रेणी पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार शिंदे, कोकणे, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल, गायकवाड, निलख यांनी केलेली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!