अवैद्य दारु वाहतुक करणा-या टॅम्पो चालकास ८,३३,२००/- रु.कि.च्या मुद्देमालसह केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट २, पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अवैद्य धंदे समुळ नष्ट करणेकामी आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील अवैद्य धंदयावर कारवाई कामी अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.पोलीस अंमलदार विजय पवार, विनोद चव्हाण व ओमकार कुंभार यांना बातमी मिळाली की, सहकारनगर भागात टेंम्पोमधुन मोठ्या प्रमाणावर हातभटटी दारुची अवैद्य दारु वाहतुक होत आहे. त्याप्रमाणे युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर यांना माहिती दिली असता, त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

Advertisement

त्याप्रमाणे युनिट २ कडील सपोनि अमोल रसाळ व त्यांचे पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.३/११/२०२४ रोजी सायं. १७/३० वा. सुमा.सी.एन.जी गॅसपाईप लाईन जवळ के. के. मार्केट बालाजी नगर पुणे येथे मिळालेल्या बातमीप्रमाणे छापा कारवाई करुन टेम्पो वरील चालक सुरेश लक्ष्मी नारायण प्रजापती वय २५ वर्ष रा. उरुळी कांचन ता. हवेली जि पुणे यास टेम्पोसंह ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या टेम्पो मधुन एकुण २४ हातभटटी दारुचे कॅन्ड (८४० लिटर हातभटटी दारुसह एकुण ८,३३,२००/-रु.कि. चा मुददेमाल जप्त केला असुन सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे येथे
गुन्हा रजि.क्र. ३७२/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम क. ६५ (क) (ई) अन्वये दाखल केलेला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ श्री. गणेश इंगळे यांचे मागदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, सपोनि अमोल रसाळ, पो. उप-निरी नितीन कांबळे, पोलीस अंमलदार विजय पवार, विनोद चव्हाण, ओमकार कुंभार, संजय जाधव, उज्वल मोकाशी, निखिल जाधव, राहुल शिंदे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!