दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १,पुणे शहर यांची उत्कृष्ट कामगिरी ! दुचाकी चोरणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन एकुण ०८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस …
पंकेश जाधव संपादक 7020794626
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा याकरीता विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार असे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजि नं ३१२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व चोरीस गेले दुचाकी गाडीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार ८७३२ साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, संजय काकडे यांचे मिळकत असलेल्या मोकळ्या जागेजवळ, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे येथे असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ एक मुलगा नमुद गुन्हयातील चोरीस गेली दुचाकी गाडीसह उभा असुन सदरची गाडी ही चोरीची असलेबाबतची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन नमुद मुलाचे ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकलीचे चासिस नंबर व इंजिन नंबर वरुन माहिती काढली व गुन्हे अभिलेखावरील अभिलेख पाहता सदर मोटार सायकलबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नं ३१२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद असलेबाबत माहिती समजल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालकांसमक्ष आणखीन चौकशी करता त्याने ०३ ऑटो रिक्षा व ०५ दुचाकी गाड्या चोरी केल्याचे सांगितल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन एकुण ०८ वाहने जप्त करुन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३१२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
२) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३२०/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
३) कोथरुड पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. २३३/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
४) सिंहगड रोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ४६४/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)
५) येरवडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ५१७/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
६) येरवडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ५१८/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
७) येरवडा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नं. ४२६/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) )
८) शिक्रापुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण, गुन्हा रजि. नं. ७८१/२०२४, भारतीय ८
न्याय संहिता कलम ३०३ (२) वरील नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन पुणे शहरचे ०७ व शिक्रापुर पो.स्टे. पुणे ग्रामीण कडील ०१ असे एकुण ०८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडुन किं रु २,५०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे शहरचे पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार, मा. श्री. पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्री निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त मा. श्री. गणेश इंगळे, गुन्हे शाखा १, पुणे शहर व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे प्रभारी अधिकारी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे, पोलीस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

