सराईत मोटार सायकल चोरांकडुन ३ मोटारसायकल जप्त करुन ३ गुन्हे उघडकीस
पंकेश जाधव संपादक 7020794626
शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:- शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरी बाबतचे गुन्हे दाखल असल्याने सदर गुन्ह्यांबा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अजित बडे व पोलीस अंमलदार हे करीत असताना उपासा दरम्यान पोलीस अंमलवार प्रविण दऊस यांना खबर मिळाली कि शिवाजीनगर मौलीरा स्टेशन गुप्ता रजि नं १५/२०२४ भादवि कलम ३७९ मधील आरोपी हा गुन्ह्यात चोरी गेलेली मोटार सायकल सहित संचेती हॉस्पीटल समोरील रोडवरून येणार आहे. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक अजित बडे, पोलीस अमलदार रणजित फडतरे, अतुल साठे, व प्रविण दडस यांनी सापळा लावून दिनांक १०/०४/२०२४ रोजी आरोपी विशाल सुरेश साळुंखे वय २२ वर्ष रा. सरकार चौक, म्हाळुंगे, हिंजवडी, पिंपरी चिंचवड, यास गुन्यातील मोटारसायकल सह ताब्यात घेतले,
सदर आरोपीकडे केलेल्या तपासात शिवाजीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं २६६/२०२३ भादवि क ३०९ या गुन्द्रमची उकल होवून सदर गुन्हा हा अटक आरोपीचा भाऊ सौरभ सुरेश साळुंखे व त्याचा साथीदारांनी केल्याचे समजले, व सदरचे पाहिजे आरोपी है कन्हाड, सातारा येथे असल्याचे समजले त्यावरुन दिनांक १०/०४/२०२४ रोजी पोलीस उप निरीक्षक अजित बडे व तपास पथकातील अंमलदार हे कन्हाड येथे जावून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल आरोपी सौरभ सुरेश साळुंखे वय २० वर्ष रा. क-हाड, सातारा पास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे त्याचा साथीदाराबाबत तपास करुन आरोपी मनोज मारूती तोळे वय २० वर्ष रा. क-हाड सातारा, यास ताब्यात घेतले. तसेच सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपी सौरभ सुरेश साळुंखे व विशाल सुरेश साळुंखे यांनी वाकड पोस्टे गु.र.नं ४६२/२०२४ भादवि क ३७९
मधील मोटार सायकलचोरी केल्याचे कबुल केले नमुद आरोपी यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त संदिपसिंह गिल्ल, मा. सहा पोलीस आयुका श्री. साईनाथ ठोंबरे, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक बंद्रशेखर सावंत, पोलास निरीक्षक अनिल माने (गुन्हे) यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अजित बडे, पोलीस उप निरीक्षक रोहिदास मुंढे, सहा. पोउपनि अविनाश भिवरे, पोलीस अंगलदार रणजित फडतरे, अतुल साठे, राजकिरण पवार, प्रविण बहस, सुदाम ठायने महिला पोलीस अंमलवार द्वारका मोहिते यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

