गाड्यांच्या काचा फोडुन लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी स्वारगेट पोलिसांकडुन जेरबंद


पत्रकार अमिता कदम पुणे प्रतिनिधी 

स्वारगेट पोलीस स्टेशन,पुणे शहर 

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ४४१/२०२४ भा. न्या. सं २०२३ चे कलम ३०३ (२), ३ २४(४) प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांची फॉरच्युर्न गाडी एम एच १२ एफ. पी. ९९९३ हि रोडचे कडेला लॉक व पार्क करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे गाडीची काच फोडुन गाडीचे नुकसान करुन फिर्यादी यांचे मालकीचा १,००,०००/- रुपये किंमतीचा अॅपल कंपनीचा लॅपटॉप, अॅपल कंपनीचा एअर पॉड असलेली बॅग त्यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरून नेले आहे म्हणून त्यांनी अज्ञात इसमांविरूध्द कायदेशीर तक्रार दिल्याने वर नमुद गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत मा. युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन शहर यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोउपनिरी रविंद्र कस्पटे, तांत्रिक विष्लेशन अंमलदार पो/ना प्रतिक लाहीगुडे, पोलीस हवालदार दिनेश भांदुर्गे व पो/अं संदीप घुले यांचे मदतीने गुन्हयातील लॅपटॉपचा शोध घेतला असता सदरचा लॅपटॉपचे लोकेशन बेंगलोर याठिकाणचे आल्याने लागलीच बेंगलोर पोलीस यांना संपर्क करुन नमुद व्यक्तीस ताब्यात घेण्यास सांगितल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेतले होते. त्यावरुन लागलीच वपोनि युवराज नांद्रे यांनी मा. वरिष्ठांची परवानगी घेवुन तपास पथकातील सपोनि चांगदेव सजगणे, पो/अं फिरोज शेख व सुजय पवार यांना बेंगलोर येथे रवाना केले होते.
सदर पथकाने बेंगलोर येथे जावुन इसम नामे सुरेश कुमार पांडुरंगन सेरवई वय ५० वर्षे रा. रामजीनगर पुंगनुर ता श्रिरंगम जि त्रिचापल्ली तामिळनाडु यास सदर ठिकाणाहुन दोन लॅपटॉप सह पुढील तपासकामी ताब्यात घेवुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे घेवून आले होते. सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करुन पोलीस कोठडी दरम्यान त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे ०२ साथीदारांसह मिळुन पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकुण ११ वाहनांच्या काचा फोडुन ११ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दाखल गुन्हयातील एकुण १,५०,०००/- रुपये किंमतीचा अॅपल कंपनीचा व डेल कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही मा.श्री. अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. रंजनकुमार शर्मा साो, सह-आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तनापाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २ पुणे शहर, मा. राहुल आवारे सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. युवराज नांद्रे साो, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उप- निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस हवालदार ४१०२ भांदुर्गे, पोलीस हवालदार ६५४४ तनपुरे, पो.हवा.२६८४, मोराळे, पो/ना ७६५७ लाहीगुडे, पो/अं १०१४७ घुले, पो/अं १००६२ शेख, पो/अं १००५७ पवार, पो/अं १००६८ चव्हाण, पो/अं ९९६३ खेंदाड, पो/अं ८२३७ टोणपे, पो/अं ७८९९ शिंदे व पो/अं २१९० दुधे यांनी एकत्र मिळुन केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!