०२ वर्षासाठी तडीपार केलेल्या गुन्हेगार केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १५/१०/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अंमलदार हे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पो.ना. नितिन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन कडुन तडीपार केलेला गुन्हेगार नामे तन्मय बेडगे हा क्वालिटी बेकरी, हडपसर याठिकाणी थांबलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी १०/४० वाजता क्वालिटी बेकरी हडपसर पुणे या ठिकाणी हडपसर पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील तडीपार गुन्हेगार इसम नामे तन्मय अजित बेडगे, वय २१ वर्षे रा. बिल्डिंग नं. १, म्हाडा कॉलनी, हडपसर, पुणे यास मा. पोलीस उप-आयुक्त. परि ५ पुणे शहर यांचे कार्यालयातील तडीपार आदेश क्र.०१/२०२३ नुसार मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (१). (अ) (ब) प्रमाणे दि.१२/०१/२०२३ रोजी पासुन ०२ वर्षासाठी पुणे शहर आयुक्तालय, पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय जिल्हयाच्या हद्दीतुन तडीपार केले असताना सुध्दा कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी न घेता मिळुन आला व सदर आदेशाचा भंग केला आहे. म्हणुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरोधात हडपसर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सचिन पवार, नितीन धाडगे, ऋषीकेश ताकवणे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!