दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हयातील २ पाहिजे सराईत गुन्हेगार केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०६/०६/२०२४ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर हददीतील बिकानेर चौकाकडुन तळजाई मंदीराकडे जाणारे रोडवरील कै. सदु शिंदे स्टेडीअमचे पुढे व सेल्फी पॉईटचे अलीकडे रस्त्याचे कडेला अंधारात काही इसम नागरीकांना लुटण्यासाठी दबा धरुन बसले असुन त्यांचेकडे कोयते, लाकडी बांबु वगैरे हत्यारे आहेत. त्यावरून सहकारनगर पोलीस ठाणेत गुन्हा नोंद क्रमांक १९३/२०२४ भादंवि कलम ३९९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ व आर्म अॅक्ट कलम ४(२५) नुसार गुन्हा दाखल आहे सदर गुन्हयात अमर काथवटे, ऋषीकेश उर्फ ऋषी शिंदे, अभिजीत चंदनशिवे यांना अटक करण्यात आले होते तर गणेश अनंत काथवटे व अमित ऊर्फ ऋद्यनाथ बाबु ढावरे. दोघे ही रा. अण्णाभाऊ साठे नगर, अरणेश्वर पुणे हे गुन्हा झाले पासुन २ महिने फरार होते.
दि. १६/०८/२०२४ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार व किरण कांबळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत पाहिजे असलेला आरोपी नामे गणेश काथवटे हा लेकटाऊन बिबवेवाडी पुणे जवळ मित्र भेटण्यासाठी येणार म्हणुन वाट पाहत थांबला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना कळविली असता त्यांनी लागलीच पोलीस उप-निरी. युवराज पोठरे व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) गणेश अनंत काथवटे वय २३ वर्षे रा. आण्णाभाऊ साठे नगर अरण्येश्वर पुणे असे सांगितले असुन गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

तसेच दि. १७/०८/२०२४ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत पाहिजे असलेला आरोपी नामे अमित ढावरे हा राहते घरी आला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना कळविली असता, त्यांनी लागलीच पोलीस उप-निरी. युवराज पोठरे व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) अमित ऊर्फ ऋद्यनाथ बाबु ढावरे वय २६ वर्षे रा. आण्णाभाऊ साठे नगर अरण्येश्वर पुणे असे सांगितले असुन गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कामगीरी मा. पोलीस उपायुक्त परि-२, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्रीमती नंदिनी वंग्याणी, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित प‌द्माळे, सागर कुंभार, सागर सुतकर, बजरंग पवार, विशाल वाघ, खंडु शिंदे यांनी केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!