गुन्हे शाखा, युनिट १ ची धडाकेबाज कामगिरी ! पुणे शहरातील मंदीरातील दानपेटी चोरी करणारे केले जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा, युनिट १ पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०८/०८/२०२४ रोजी फिर्यादी यांनी प्रगतिशील मित्र मंडळ गणपती मंदीर, ४०८ नारायण पेठ पुणे येथे दि.०८/०८/२०२४ रोजी रात्रौ ००/३० वा ते सकाळी ०६/१५ वा चे दरम्यान मंदीर बंद असताना कोणी तरी अज्ञात चोरट्याने दरवाजा ढकलुन उघडुन मंदीरातील दानपेटी त्यातील किं. रू. ११,०००/- चा चोरी करून उचलून नेली आहे. म्हणुन दिलेल्या तक्रारी वरून विश्रामबाग पो.स्टे. येथे गु.र.नं.२०४/२०२४, भा.न्या.सं.२३ चे कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरवस्तीमध्ये मंदीरामधील दानपेटी चोरी सारखा गुन्हा घडल्याने वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे वपोनि शब्बीर सय्यद यांनी घटना स्थळापासुन विविध भागातील सी.सी.टी.व्ही. फुटेज पहाणे कामी युनिट-१ कडील पोलीस अधिकारी आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार निलेश साबळे, दता सोनावणे, महेश बामगुडे, महेंद्र तुपसुंदर, असे तपास पथक तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केली असता, प्राप्त झालेल्या फुटेजची पहाणी करीत असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे व दत्ता सोनावणे यांनी सदर गुन्हा करते वेळीचे आरोपीचे सीसीटिव्हि फुटेज मधील दुचाकी गाडीचा नंबर प्राप्त करुन त्यावरुन सदर मालकाचा नाव पत्ता वरुन मालकाचा शोध घेवुन सदर मालकाकडे सखोल चौकशी करता त्याने सदर गाडी त्याची असल्याचे सांगितले सदर मोटर सायकलचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेज त्यास दाखविले असता त्याने पाहुन ट्रीपल शिट असलेल्या मुलांपैकी दोन मुलांना ओळखुन त्यांचेकडुन प्राप्त माहितीच्या आधारे इंदीरा वसाहत झोपडपट्टी गणेशखिंड रोड औंध पुणे येथे आम्ही स्वतः व वरील स्टाफसह सापळा रचला असता विर्धीसंर्घषित बालक मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयांचे अधिक चौकशी करता त्याने साथीदार नामे साहिल माने, व विर्धीसंर्घषित बालक यांचेसह दानपेटी चोरी केली असल्याचे सांगितले. त्याचेकडे केलेला तपासामध्ये संत तुकाराम मंदीर, तुकाराम पादुका चौक डेक्कन, शनिपार चौक येथील देवी मंदीर, प्रगतिशील मित्र मंडळ गणपती मंदीर येथील दानपेटी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच बातमीदारांमार्फत बातमी मिळाली असता साहिल माने हा त्याचे राहते घरी आला असुन वरील स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेवुन त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव साहिल अशोक माने वय १९ वर्ष रा. इंदीरा वसाहत औंध पुणे असे सांगितले त्यास ताब्यात घेवुन त्याची अधिक चौकशी करता त्याचेकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहे.
१. डेक्कन पो स्टे गुरनं १२१/२०२४ भा.न्या.सं. ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (ड) २. विश्रामबाग पो स्टे गुरनं २००/२०२४ भा.न्या.सं. ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ)
३. विश्रामबाग पो स्टे गुरनं २०४/२०२४ भा.न्या.सं. ३३१ (३) ३३१ (४), ३०५ (अ)
४. चतुःश्रृंगी पो स्टे गुरनं ६८०/२०२४ भा.न्या.सं. ३०५
वरील प्रमाणे चार गुन्हे उघडकीस आले असुन त्यांचे कडे इतरही तपास चालू असुन त्यांना पुढील कारवाई कामी डेक्कन पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ०१, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद, सहा. पो. निरी आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, निलेश साबळे, महेश बामगुडे, महेंद्र तुपसुंदर, आण्णा माने, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, विठ्ठल सांळुखे, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

