शिवाजीनगर पोलीस ठाणेकडून सराईत गुन्हेगार गावठी पिस्टलसह जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

शिवाजीनगर पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २२/०९/२०२४ रोजी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना त्याच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की, नाना-नानी पार्क जवळील सुलभ शौचालय या ठिकाणी रेकार्डवरील गुन्हेगार अंधाजी कल्याणी शिगे हा उभा असून त्याच्या जवळ गावठी पिस्टल आहे, अशी बातमी मिळाल्याने स.पो.नि. पांढरे यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठांना कळविली असता त्यांनी योग्य त्या सुचना देऊन योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, सदर ठिकाणी पोलीस स्टाफ, पंच असे सापळा रचून त्यास पकडून त्याचे अंगझडतीचे कारण त्यास सांगून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता आंबाजी कल्याणी शिंगे वय २४ वर्ष रा. नवीन म्हाडा कॉलनी बिल्डिंग नंबर ३९, रुम १११, ससाने नगर, हडपसर पुणे

असे सांगितले. तेव्हा नमुद इसमाची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला अंदाजे ३६,०००/- कि.चा एक गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक राऊड मिळून आल्याने गुन्हा नोंद करुन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

तसेच नमुद आरोपी आंबाजी कल्याणी शिंगे हा रेकॉर्डवरील असून त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त श्री संदिप गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री.साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सपोनि. संजय पांढरे, सपोनि. कैलास दाबेराव, पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, अतुल खाडे, राजकिरण पवार, सचिन जाधव, महावीर वलटे श्रीकृष्ण सांगवे यांनी केली


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!