गोमांस वाहतुक करून घेवुन जात असलेला ट्रक दौंड पोलिसांच्या ताब्यात…


पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण

दौंड पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण

Advertisement

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१८/०८/२०२४ रोजी सायंकाळी ०६/४५ वाजण्याचे सुमारास गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन रा. महादेवनगर, उरुळीकांचन ता.हावेली जि.पुणे यांना मिळालेल्या माहीतीनुसार खडकी ता. दौंड जि. पुणे गावचे हद्दीत आकांशा हॉटेल समोर असणारे मोकळया जागेत पुणे बाजुकडे जाणारे लेनवर हैद्राबाद येथुन सोलापुर, टेंभुर्णी, भिगवण, रावणगाव, पुणे मार्गे मुंबई येथे गोमांस वाहतुक करून घेवुन जात असलेला एक १८ टायर कंटेनर ट्रक नं.MH 46 AR 0516 हा मौजे खडकी ता. दौंड जि. पुणे गावचे हद्दीत आकांशा हॉटेल समोर असणारे मोकळया जागेत पुणे बाजुकडे जाणारे लेनवर पकडुन सदर कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये २५,००० किलो वजानाचे गोमांस व ४,०००/- किलो वजनाचे म्हशीचे मांस कंटेनरसह त्याची एकुन ५९,२०,०००/- रूपये किंमतीचे गोमांस व म्हशीचे मांस असले बाबत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कंटेनरवरील चालकाचे नाव चंद्रकांत दत्तु साळुंखे रा. खांदाकॉलणी ता. पनवेल जि. रायगड असे आहे. त्याबाबत कंटेनर चालक याचे विरूध्द दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यातआलेला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे. सदरची कारवाई मा.श्री. पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.श्री. रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक पुणे, मा.श्री. आण्णासाहेब घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संतोष डोके पोलीस निरीक्षक दौंड पोलीस स्टेशन, तुकाराम राठोड सहा. पोलीस निरीक्षक, सहा. फौजदार कुंभार, पो. हवा. बंडगर, पो. हवा. पांढरे, पो.हवा. राऊत, पो. कॉ. कोठावळे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास स. पो. नि. राठोड हे करीत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!