वृध्द महीलेच्या गळ्यातील जबरदस्तीने सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी करणा-या आरोपीच्या सिंहगडरोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या


पंकेश जाधव संपादक 7020794626

सिंहगडरोड पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि.१२/०९/२०२४ रोजी स्वामी नारायण मंदिर परीसरातुन एका वृध्द महिलेस पत्ता विचारण्याचा बहाणा करुन तिचे गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावुन चोरी करुन घेवुन गेल्याने सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेच्या अनुषंगाने मा. पोलीस उप आयुक्त परि ३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग, श्री. अजय परमार, व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे पुणे श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अतुल भोस, यांनी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, सचिन निकम, व त्याचे पथकास सदरचा गुन्हा उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे अधिकारी सचिन निकम सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलीस अंमलदार असे दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा गुप्त बातमीदारामार्फत, तांत्रिक विश्लेषणाव्दारे, आरोपीचा शोध घेत असताना, सिंहगड रोड पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, व पोलीस अंमलदार अमोल पाटील, यांना त्यांचे खास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हा जेएसपीएम कॉलेज वाघोली समोरील काही अंतरावरील बिल्डींग जवळ थांबलेला आहे अशी बातमी मिळाल्याने वरिष्ठांनी सदरच्या बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन बातमीतील वर्णनाप्रमाणे एक इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव ओम महादेव यादव वय १९ वर्षे रा. हनुमान मंदिर जवळ कोरडेवाडी ता. केज जि. बीड सध्या रा. बकोरी फाटा जेएसपीएम कॉलेज जवळ, वाघोली पुणे. असे असल्याचे
सांगितले

त्याचेकडे दाखल गुन्हया बाबत अधिक तपास केला असता त्याने दाखल गुन्हयातील चोरी केलेले १ लाख रुपये किंमतीचे २१.४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हे आरोपीने त्याचे घरामध्ये लपवुन ठेवल्याचे सांगितल्याने सदरचे सोन्याचे मंगळसुत्र हे जप्त करण्यात आले असुन त्यास सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ५०५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) या गुन्ह्यात अटक करुन त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत

त्याचेकडे दाखल गुन्हया बाबत अधिक तपास केला असता त्याने दाखल गुन्हयातील चोरी केलेले १ लाख रुपये किंमतीचे २१.४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हे आरोपीने त्याचे घरामध्ये लपवुन ठेवल्याचे सांगितल्याने सदरचे सोन्याचे मंगळसुत्र हे जप्त करण्यात आले असुन त्यास सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ५०५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) या गुन्ह्यात अटक करुन त्यास मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री. अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिंहगडरोड पो स्टे पुणे श्री. अतुल भोस. यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, उत्तम बांदल, अमोल पाटील, देवा चव्हाण, विकास पांडोळे, शिवाजी शेडगे, तारु, राजु वेगरे, पंकज देशमुख, विकास क्षिरसागर, राहुल ओलेकर ,स्वप्नील मगर, विनायक मोहीते, यांचे पथकाने केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!