“वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या वंटी बबलीचा पर्दाफाश” भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी


पंकेश जाधव संपादक 7020794626

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे वाहन चोरांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, स्वामी नारायण मंदीर येथे एक इसम वाहन चोरीची गाडी घेवुन थांबला आहे. लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी स्वामी नारायण मंदीर येथे जावुन तेथे सापळा रचुन थांबले असता इसम नामे रोहन श्रीराम पाठक, वय २० वर्षे, रा. फ्लॅट नंबर ५१०, नवीन बिल्डींग, स्वामी नारायण मंदीराचे मागे, नव्हे गाव, पुणे मुळ गाव धनगर गल्ली, आंबेजोगाई, जि. बीड हा त्याचे ताब्यात स्प्लेंन्डर दुचाकी गाडी क्रमांक MH13AW6810 हिच्यासह मिळुन आल्याने त्या गाडीबाबत तपास करता त्याने सदरची गाडी त्याची मैत्रिण सायली कदम हिच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. सदरची गाडी ही भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७८९/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा उघडकीस आला आहे.

Advertisement

अटक आरोपीताकडे अधिक तपास करता त्याने व त्याची मैत्रिणीने कात्रज भागातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८४४/२०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील चोरीस गेली स्लॅन्डर दुचाकी गाडी, तिचा नंबर MH12RD0366 ही जप्त केली आहे.

वरील प्रमाणे आरोपीतांकडुन ९५,०००/- रुपयांचे २ दुचाकी वाहने जप्त करून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७८९/२०२३, भादंवि कलम ३७९

२. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८४४/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्यये

सदरची कामगिरी मा. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे (अतिरीक्त कार्यभार सह आयुक्त, पुणे शहर), मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा.नारायण शिरगावकर साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक थिरज गुप्ता, पोलीस अंमलदार महेश बारचकर, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, बापु भिंगारे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवघुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सायंत यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!