राहते घरातुन रागाचे भरात ४ महीनी पुर्वी गेलेल्या अल्पवयीन बालकास मध्यप्रदेश येथील जबलपुर येथुन घेतले ताब्यात स्वारगेट तपास पथकाला यश.


उल्लखनीय कामगीरी बद्दल मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांचेकडुन ५ लाखाचे बक्षीस जाहीर.

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे शहर गु.र.नं.२१७/२०२४ भा.द.वि. कलम ३६३ अन्वये दाखल असून दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन बालक हा गेली चार महिने झाले राहते घरातून रागाचे भरात निघून गेला होता. सदर बालकाचा शोध पुणे पोलीसाकडुन चालू होता. अशातच गेली चार महिन्यापासून बालक मिळून येत नसल्याने त्यास बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.
तरी सदर बालक याचा शोध लागत नसल्याने त्या अनुषंगाने बालकाचे फोटो इतर राज्यात पाठवून सदर बालका बाबत माहिती असल्यास प्रत्यक्ष फोन द्यारे कळवावे याबाबत अनेक राज्यात फोटो पाठवण्यात आले होते.

Advertisement

त्यावरून सदरचे बालक हे जबलपूर मध्य प्रदेश येथील रेल्वे स्थानकावर दिसून आल्याचे खात्री दायक माहिती स्वारगेट तपास पथकाचे सह प्रभारी पो.उप निरी अशोक येवले यांना लागली. असता त्यानी तात्काळ सदरची माहीती मा. पोलीस उपायुक्तसो परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम व वपोनी सोो भारती विद्यापीठ दशरथ पाटील सो. यांना कळवुन तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर बालकास ताब्यात घेण्यात आले तसेच तात्काळ मा. पोलीस उपायुक्त असो परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील मॅडम यांच्या सूचना व मार्गदर्शननुसार सदर बालकास ताब्यात घेण्याकरता स्वारगेट तपास पथक टीम रवाना करुन सदर बालक यास आज रोजी जबलपूर मध्य प्रदेश येथुन ताब्यात घेऊन पुणे शहर येथे घेऊन येवुन त्याच्या आई- वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले आहे.

सदर केलेल्या उल्लखनीय कामगीरी बद्दल मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पाच लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

सदरची कामगीरीही मा.श्री प्रविण पाटील अप्पर पोलीस आयुक्त साो, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा.श्रीमती स्मर्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, मा. श्रीमती नंदिनी वग्यानी मॅडम साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली वपोनी सोो भारती विद्यापीठ दशरथ पाटील सो यांच्या सुचना व आदेशान्वये तपास पथकातील उपनिरीक्षक श्री अशोक येवले व पो.अं. फिरोज शेख, पो.अं. हर्षल शिंदे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!