फायटर कोंबड्यांची पैशांवर झुंज लावुन जुगार खेळणारे व कोंबड्यांना क्रूरपणे वागणुक देणा-या ६ आरोपींना केले जेरबंद
फैयाज शेख पुणे प्रतिनिधी
वानवड पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.१९/१०/२०२५ रोजी वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना, तपास पथकाचे पोलीस अंमलदार गोपाळ मदने व अमोल पिलाणे यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, इम्प्रेस गार्डनये पाठीमागे, बंगला नंबर २ जवळ, रस्त्यालगत मोकळया जागेत, घोरपडी, पुणे येथे सार्वजनीक ठिकाणी पाच ते सहा इसम हे पैशावर कोंबड्याची झुंज लावुन, त्यावर जुगार खेळत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन बातमीतील वर्णनाचे इसम हे नमुद ठिकाणी एकुण ०६ कोंबडांची पैशावर झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हार जीतचा खेळ खेळत असतांना मिळुन आल्याने सापळा रचुन अचानकपणे छापा टाकुन पैशांवर कोंबड्यांची झुंज लावणारे ०६ इसर्माना जागीच पकडले. त्यांना त्यांची नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १) अमोल सदाशिव खुर्द वय ४७ वर्षे रा. रविवार पेठ, पुणे २) मंगेश आप्पा चव्हाण वय ५५ वर्षे रा. भवानी पेठ, पुणे ३) निखिल मनिष त्रिभुवन, वय २० वर्षे रा. घोरपडी पुणे, ४) अमिर आयुब खान, वय २८ वर्षे रा. घोरपडीगांव, पुणे, ५) सचिन सदाशिव कांबळे, वय ४२ वर्षे रा. भवानी पेठ, पुणे ६) प्रणेश गणेश पॅरम, वय २७ वर्षे रा. कॅम्प, पुणे अशी असल्याचे सांगुन ते सदर ठिकाणी पैशावर कोंबड्यांची झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हार जीतचा खेळ खेळत असलेबायत सांगीतले. सदरवेळी त्यांचेकडुन सदरचे ६ रंगीबेरंगी कोंबडे व त्यांची ने-आण करण्यासाठी आरोपीतांनी वापरलेल्या तंगुसच्या ६ पिशव्या, ३ मोटारसायकल, ५ मोबाईल हॅन्डसेट, २५८०/-रु. रोख रक्कम इत्यादी एकुण ५,११,८८०/-रु.कि.चा मुद्देमाल हस्तगत्त करण्यात आला आहे. नमुद सर्व आरोपीतांविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४२४/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (ब) व प्राण्यांना कुरपणे वागणुक देण्यास प्रतिबंध करणेबाबतचा अधिनियम कलम ११ (इ) (न) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री.धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी पो. स्टे. पुणे शहर भाऊसाहेब पाटील, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. विजयकुमार डोके यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, अर्षद सय्यद व सुजाता फुलसुंदर या विशेष पथकाने केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

