मोक्का गुन्हयातील १ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस केले जेरबंद
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर
महापोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४६/२०२४ मा.न्या.सं.क.१०९ (१), ११८(१),१८९(१),१८९(४), १९०,१९१(२), आर्म अॅक्ट क. ४ (२५), क्रि. लॉ. अमे. क. ७ व म.पो.का.क.३७(१) सह १३५ व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अधि. १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) प्रमाणे दाखल गुन्हयातील फरारी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अमंलदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे अजय भागवत घाडगे वय २४ वर्षे रा. कचरावत चाळ, शनिनगर चौक, दत्तनगर कात्रज पुणे हा दत्तनगर कात्रज पुणे येथे त्याचे आई वडीलांना भेटयासाठी येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन सदर आरोपीस शिताफीने पकडुन मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर यांचे समक्ष हजर ठेवले असता त्यांनी सदर आरोपीस दाखल गुन्हयात दि.१४/१०/२०२५ रोजी अटक केली आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनाप्रमाणे पर्वती पोलीस स्टेशन कडील तपास पथाकतील पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, नानासो खाडे, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे, स्वप्निल घुगे, मनोज बनसोड, अमित चिव्हे व किर्ती भोसले यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

