सणासुदीच्या पार्श्वभुमीवर गुन्हेगारांवर पोलीसांची नजर -तडीपार आरोपीस घेतले ताब्यात
पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626
मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महापोलीस न्यूज ! ऑनलाइन पुणे :- दिनांक १८/१०/२०२५ रोजी मुंढवा पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलीग करीत असताना पोलीस अंमलदार कदम यांना त्याचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, तडीपार इसम नामे विनीत राजु छत्री हा सायंकाळी उशीरा त्याचे नातेवाईक यांना भेटण्यासाठी बी.टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी तात्काळ सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर यांना सांगीतली. सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर यांनी सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पो.स्टे. पुणे यांना फोनद्वारे कळवुन, सदर ठिकाणी जावुन पोलीस रेकॉर्डवरील तडीपार इसम नामे विनीत राजु छत्री वय ३२ वर्षे, रा.स.नं.४८ लेन नं.०२ मिलींदनगर घोरपडी पुणे यांस ताब्यात घेवुन, मुंढवा पोलीस स्टेशन येथे हजर केले. सदर आरोपीविरुध्द मुंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २७५/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार राहुल मोरे करीत आहे.
सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अनुराधा उद्द्मले यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस स्टेशन श्रीमती स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस अंमलदार रुपेश तोडेकर, अक्षय धुमाळ व स्वप्नील रासकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

