अनैतिक संबंधातुन पत्नीने प्रियकराचे मदतीने केला पतीचा खून पत्नीस व प्रियकारास ४८ तासात अटक, भारती विद्यापीठ तपास पथकाची कामगीरी


पंकेश जाधव संपादक 7020794626

भारती विद्यपीठ पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २३/०९/२०२४ रोजी सकाळी ०७.३५ वा भारती हॉस्पिटल कात्रज पुणे येथुन भारती पोलीस ठाणे येथे खबर मिळाली की, इसम गोपीनाथ बाळु इंगुळकर वय ३७ वर्षे रा. दुगडशाळे जवळ सच्चाईमाता मंदिर जवळ कात्रज पुणे यांना बेशुध्द अवस्थेत भारती हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टर यांनी उपचारापुर्वी मयत घोषीत केले. आकस्मात मयत रजि. २२९/२०२४ प्रमाणे दाखल करण्यात आले व ससुन हॉस्टिटल येथे मयताचे शय विच्छेदन झाल्यानंतर मयतास मरण हे गळा दाबल्याने आल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर मयत इसमाचा भाऊ नामे संभाजी बाळु इंगुळकर यांनी त्यांचे भाऊ मयत इसम यास अकस्मीत करणाने मरण आले नसुन त्याचा खुन झाला असल्याचा संशय व्यक्त केल्याने त्यांचे फिर्यादी वरुन भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं.७८७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३ (५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री डी.एस.पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ सदर गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपी निष्पन्न करणेबाबत भारती विद्यापाठ पोलीस ठाणे तपास पथक यांना आदेश दिले यरुन तपास प्रमुख श्री समिर कदम यांनी वपोनि यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकामधील अंमलदार यांच्या चार वेगवेगळ्या टिम तयार करुन रवाना केल्या. त्यावरुन स.पो. फौ. श्री नामदेव रेणुसे व सतिश मोरे यांनी मयताचे राहते घराचे ठिकाणी तसेच मयत व मयताची पत्नी यांचे मुळ गावी जावून गोपनीय रित्या माहिती घेतली असता मयताची पत्नी नामे राणी गोपीनाथ इंगुळकर वय ३२ वर्षे रा. दुगड शाळेजवळ सच्चाई माता मंदिर कात्रज पुणे हिचे बाहेर अनैतिक संबंध असले बाबत माहिती मिळाल्याने मयताचे पत्नीस चौकशी कामी पोलीस ठाणे येथे बोलावून तिचेकडे सखोल कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता तिने प्रथम उडवाउडवीची व असमाधाकारक उत्तरे दिली तिने माझा पती हा स्वताः आपला गळा दाबत होता असे सांगितले आणि त्याने स्वताःच आपला गळा दाबलेला आहे असे सांगत होती. याचा संशय आल्याने आम्ही अधिक सखोल तपास करुन विश्वासात घेवुन विचारता तिने तिचा प्रियकर नामे नितिन शंकर ठाकर रा.कुरण ता. वेल्हा जि.पुणे याने आणि मी संगनमत करुन माझा पती गोपीनाथ बाळु इंगुळकर याचा आम्ही दोघांनी मिळून हात-पाय धरुन गळा दाबुन खुन केल्याची कबुली दिली.

यावरुन लागलीच नितिन शंकर ठाकर याचा शोध घेत असताना सपोफी नामदेव रेणुसे व सतिश मोरे यांनी गोपनीय माहिती घेतली असता तो त्यांचे गावी पळून जाणार असल्याची माहिती मिळताच पोउपनिरी निलेश. मोकाशी, सपाफी नामदेव रेणुसे, पोलीस अंमलदार निलेश ढमढेरे व सतिश मोरे यांनी स्वारगेट या ठिकाणी सापळा रचुन शिताफिने आरोपीस ताब्यात घेतले. त्याचेकडेही सखोल कौशल्यपुचक तपास करता तो ही प्रथम उडवा-उडवीची व असमाधाकारक उत्तरे देत होता. त्यास विश्वासात घेवुन तपास करता त्याने ही सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
दाखल गुन्हयांत आरोपी १. राणी गोपीनाथ इंगुळकर वय ३२ वर्षे रा. दुगड शाळेजवळ सच्चाई माता मंदिर कात्रज पुणे. मुळ गांव सुरवड/वांगणी ता. वेल्हे जि.पुणे २. नितिन शंकर ठाकर रा. कुरण ता.वेल्हा जि.पुणे यांना अटक करण्यात आली असुन त्यांची मा. न्यायालयाने दिनांक ३०.०९.२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असुन सदरच्या पोलीस कस्टडीमध्ये आरोपी राणी गोपीनाथ इंगुळकर व तिचा प्रियकर नितिन शंकर ठाकर यांचे प्रेमसंबध गेले १० वर्षापासुन असुन पती अडसर येत असल्याने दोघांनी कट रचुन खुन केल्याची कबुली दिली आहे.

पुढील तपास सपोनि श्री भोजलिंग दोडमिसे हे करीत आहेत

कबुली दिली आहे. पुढील तपास सपोनि श्री भोजलिंग दोडमिसे हे करीत आहेत


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!