चोरुन हातभट्टी दारु विक्री करण्या-या ०२ सराईत आरोपींना पुण्यातुन तडीपार
पंकेश जाधव संपादक 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे चोरुन हातभट्टी दारु विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सुचीत केले होते. त्याप्रमाणे कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीपणे चोरुन हातभट्टी दारु विक्री करणारे गुन्हेगार नामे १) संजय नवनाथ गव्हाणे, वय ३७ वर्षे, रा. स.नं.४४/४५ गल्ली नं.०१ संत ज्ञानेश्वरनगर कोंढवा खुर्द पुणे मुळगांव सोलापुर व २) शामसुंदर प्यारेलाल परदेशी वय ६२ वर्षे रा. कमेला झोपडपट्टी, साळुंखे विहार रोड, कोंढवा खुर्द पुणे यांचेवर वेळोवेळी गुन्हे दाखल करुन प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.
तरी देखील आरोपी हे बेकायदेशीरपणे व्यवसाय करित असल्याने सदर आरोपी यांच्या विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन त्यांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर यांनी दोन्ही आरोपी यांना पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दीतुन तडीपार केले आहे.
सदर कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री. आर. राजा मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. धंन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे श्री. विनायक पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे म. पोलीस उप-निरीक्षक स्नेहल जाधव, पोलीस अंमलदार राजाराम कोलते, नितीन चव्हाण, सुनिल कोकाटे, हनमंत रुपनवर व फिरोज अत्तार यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

