सनी जाधव (टोळी प्रमुख )मोक्का व खुनाच्या प्रयत्नातील गुन्हयात दोन महिन्या पासुन फरार असलेला सराईत गुंड सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. २५/१०/२०२३ रोजी रात्री ०८.३० या सुमारास बालाजीनगर येथील शिळीमकर पेट्रोल पंप जवळ फिर्यादी आकाश मारुती सोनावणे अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी यांना जुन्या भांडणाच्या कारणा वरुन भांडणात मध्यस्थी करतोस काय, जारत शहाणा झालास का, याला मारून टाकू, याला आता संपवाययाच असे असे बोलून यवलू कोठारी, सल्या शेख, रानी जाधव यांनी संगनमत करून जिवे गारण्याच्या हेतुन कोयत्याने वार केले व हातातील कोयते, बांबू हयेत फिरवून आजूबाजूच्या लोकांसमोर आम्हीच इथले भाई आहोत, कोणी नडला तर त्याला तोडणारच असे जोरजोराने ओरडून दहशत केली व त्यानंतर ते सर्वजण गाडीवर वसून तेथून निघून गेले. त्यावायत सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं २७७/२०२३ भादवि कलम ३०७,३२३,५०४,५०६, आर्म अॅक्ट ४ (२५), मपोका कलम ३७ (१) (३) सह १३५ किमीनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७, मोका कायदा कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हया मध्ये बबलू कोठारी, सलमान शेख यांना अटक करण्यात आली होती तर सनी जाधव हा
गुन्हा झाले पासुन २ महिने फरार होता, दि. १४/१२/२०२३ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस ठाणे येथे हजर असताना मोक्का मध्ये पाहिजे असलेला टोळी प्रमुख सराईत गुन्हेगार सनी जाधव याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्हयांत फरार असलेला आरोपी नामे सनी जाधव हा कात्रज येथे राजस सोसायटी चौकातील गणपती मंदिरा जवळ मित्र भेटण्यासाठी येणार म्हणुन वाट पाहत थांबला आहे अशी खात्रीशिर वातमी मिळाल्याने सदरची चात्तमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना कळविली असता त्यांनी लागलीच पो उपनिरी. राहुल खंडाळे व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकून आरोपीस ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सनी शंकर जाधव वय २६ वर्षे रा. चैत्रवन वसाहत गल्ली नंबर १०, माताजी सुपर मार्केट शेजारी अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी पुणे असे सांगितले असुन त्याच्याकडे सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं २७७/२०२३ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार बबलू कोठारी, सलमान शेख यांच्यासह केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपी सनी जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्नचे ०२, जबरी दुखापत ०१, दरोडा ०१, मारामारी अशा प्रकारचे एकुण १२ गुन्हे बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल असुन त्याच्यावर आता पर्यंत १ वेळा एमपीडीए कायदया प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तरोब सदर आरोपीस यापुर्वी ०२ वर्षा करीता पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय तसेच पुणे जिल्यातुन तडीपार करण्यात आले होते सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सतो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री प्रविणकुमार पाटील सोो, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सोो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, सुशांत फरांदे, महेश मंडलिक, भुजंग इंगळे, सागर सुतकर, बजरंग पवार, विशाल वाघ नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांनी केली आहे.
Bal

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

