मोक्यातील मागील सहा महिन्यापासुन फरारी आरोपीस केले जेरबंद.


कुणाल घोडके कार्यकारी संपादक 9860394949

बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलीस न्यूज! ऑनलाईन पुणे:- बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर गु. रजि. नं. २२५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३५२, ३५१(२), ३५१ (३), १२६(२), ३(५), अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले असल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व. सदर गुन्हयातील आरोपीतांन विरूद्ध इतर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

सदर गुन्हयातील आरोपीतांन विरुध्द संघटीत गुन्हेगारी कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. यातील आरोपी सौरभ तिमप्पा धनगर वय २४ वर्षे रा. लेन नं.०२, घर नं.०३, सारीपुत्त बुद्ध विहार शेजारी, १३ ताडीवालारोड, पुणे हा गुन्हा घडले पासुन फरार झालेला होता, सदर आरोपीचा मा. सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल लोहार व पोलीस अंमलदार बडे, भोकर, यांनी वर नमूद आरोपीस बातमीदाराचे माहितीवरुन त्यास रायचुर (राज्य कर्नाटक) येथुन रोजी ताब्यात घेवुन त्यास बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २२५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ३(५). १२६ (२), व इतर या दाखल गुन्हात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परि. २. पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे श्री. दिपक निकम, बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल लोहार, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, यांचे पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!