गुन्हे शाखा, युनिट १ ची उल्लेखनिय कामगिरी ! कोणताही पुरावा नसताना २४ तासात खुनाचा गुन्हा उघड करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट १ पिंपरी चिंचवड शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- दि.०२/०२/२०२५ रोजी पाटीलनगर, चिखली पुणे येथील वनविभागाच्या जागेत एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने तसेच धारदार हत्याराने मारहाण व वार करुन खुन करुन आरोपी हे कोणताही पुरावा न ठेवता फरार झाले होते. सदर खुनाच्या अनुषंगाने चिखली पोलीस ठाणे गु.रजि.नं. ७४/२०२५ बीएनएस कलम १०३ (१), २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड व स्टाफ असे या गुन्हयाचा समांतर तपास करित असताना गुन्हा घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदार यांचे मार्फतीने आरोपींचा शोध घेत असताना अधिकारी व स्टाफ यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन सुमारे ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन व गोपनीय बातमीदार या मदतीने माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा १) सुरज हणुमंत इंगळे, वय २९ वर्षे, रा. इंदिरा गार्डन जवळ, पाटीलनगर, चिखली, पुणे, २) मेहुल कैलास गायकवाड, वय २८ वर्षे, रा. इंदिरा गार्डन जवळ, पाटीलनगर, चिखली, पुणे ३) अजय अशोक कांबळे, वय २४ वर्षे, रा. इंदिरा गार्डन जवळ, पाटीलनगर, चिखली, पुणे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने वरील आरोपी यांना पाटीलनगर, चिखली, पुणे परिसरातुन ताब्यात घेतले आहे.

वरील आरोपी यांना गुन्हे शाखा, युनिट १ कार्यालय, मोहननगर, चिंचवड, पुणे येथे आणुन त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी सदर मयत अनोळखी इसमाला मारहाण करुन त्याचेजवळील पैसे दारु पिण्यासाठी काढुन घेण्याकरिता सदर अनोळखी व्यक्तीचा खुन केला आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर मयत अनोळखी इसम याबाबत तपास केला असता मयम इसम हा भैय्या गमन राठोड, वय-३३वर्षे, राह इंदिरा गार्डनजवळ, पाटीलनगर, चिखली, पुणे, मुळगाव-मु. सोनगाव, पो. केरडे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत इसम हा सुमारे ३ महिन्यापुर्वी पिंपरी चिंचवड शहरात कामाधंदयासाठी त्याचे कुटुंबासह आला होता.
आरोपी अजय अशोक कांबळे, वय २४ वर्षे, रा. इंदिरा गार्डन जवळ, पाटीलनगर, चिखली, पुणे याचेवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली, पिंपरी, म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अमंलदार महादेव जावळे, सोमनाथ बोऱ्हाडे, मनोजकुमार कमले, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, श्रीधन इचके, अजित रुपनवर, तुषार वराडे, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, स्वप्नील महाले. तानाजी पानसरे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!