एक महिन्यापासून मोक्का गुन्हयामध्ये पाहिजे असलेले मुख्य आरोपी जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा,पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १३४२/२०२४ भा.न्या.स.का कलम १८९(२),१८९(३), १९०,३२४(४),३५१(२), आर्म अॅक्ट ३ (२५), ४ (२५) मध्ये ३७(१) (३) १३५ मोका कलम मधील पाहिजे मुख्य आरोपी नामे १) राहुल बाळासाहेब तुपे, वय ३४, रा. हडपसर पुणे २) सागर रमेश धुमाळ, वय-४३, महादेवनगर मांजरी, पुणे हे वरील प्रमाणे दाखल गुन्हयांतील आरोंपी फरार झाले होते. सदर गुन्हयांतील आरोपी फिर्यादी यांना वारंवार जिवे मारण्याची धमकी देत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

सदर गुन्हयांचे अनुषंगाने खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा यांनी यातील आरोपीबाबत गोपनीय माहिती काढली असता सदर आरोपी हे गुन्हा केल्यानंतर नेपाळ येथे पळून गेले होते व नेपाळ येथून लखनऊ विमानतळ ते पुणे विमानतळ येथे विमानाने येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाल्याने तात्काळ पोनि विजय कुंभार यांनी पथक तयार करून रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक देव, व स्टाफ यांनी सदर ठिकाणी जावून सापळा रचून आरोपी नामे १) राहुल बाळासाहेब तुपे, वय ३४, रा. हडपसर पुणे २) सागर रमेश धुमाळ, वय-४३, महादेवनगर मांजरी, पुणे ताब्यात घेतले व पुढील तपास कामी हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, सपोनि प्रशांत संदे, पोलीस उप निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, दिलीप गोरे, अमोल घवटे, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, गणेश खरात, पवन भोसले, चेतन आपटे, अजिनाथ येडे, महिला पोलीस अंमलदार रुपाली कर्नावर, आशा कोळेकर, यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!