जबरीने गळयातील सोन्याची चैन चोरणारे ०४ आरोपीतांचा शोध घेऊन दोन गुन्हे उघडकीस आणले


पंकेश जाधव संपादक 7020794626

विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं २११/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३, कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये दाखल गुन्हयात लक्ष्मी रोड, पुणे येथे दिनांक १२/०८/२०२४ रोजी फिर्यादी त्याच्या दुचाकीवरुन रस्त्याने रात्री ००.३० वाजता जात असताना दोन दुचाकीवर चार अनोळखी इसम येवुन त्यांनी फिर्यादीस, तु आमच्या अंगावर का थुंकला असे भांडण काढुन फिर्यादीला हाताने मारहाण करुन फिर्यादीचे गळयातील २० ग्रॅम वजानाची सोन्याची चैन हिसकावुन नेली होती. सदर गुन्हयाचा तपास करणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे अधिकारी मनोज बरुरे व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.
दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग तपास पथकातील अंमलदार राहुल मोरे यांनी तांत्रीक विश्लेषनाचे आधारे गोपणीय खबरी यांचे मदतीने सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) कासीम आसीफ अन्सारी वय २२ वर्षे, छोटी मस्जिदचे पाठीमागे, मोमीनपुरा, २०७ गंजपेठ, पुणे २) अनिकेत अनिल फासगे वय २२ वर्षे, रा. वस्ताद साळवे स्मारकाचे पाठीमागे, ६३३ गंज पेठ, पुणे ३) आश्रफ गवुस सय्यद वय २० वर्षे, रा नवीन म्हाडा, बिल्डींग न २१, तिसरा मजला, फ्लॅट नं ३१०, वैदुवाडी, हडपसर, पुणे व ४) विधीसंघर्षीत यांनी केल्याचे निष्पन्न केले.

गुन्हयातील आरोपीत यांना क्रांती चौक, बुधवार पेठ, पुणे येथुन पोउपनि बरुरे व पोलीस अंमलदार गणेश काठे, राहुल मोरे, आशिष खरात, संतोष शेरखाने, सात्ताप्पा पाटील, अर्जुन थोरात यांनी नमुद आरोपीस पकडुन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी वारजे पोलीस स्टेशन हददीत एका दुचाकीस्वारास अडवुन त्यांच्या गळयातील सोन्याची साखळी हिसकावुन घेतल्याचे कबुल केले असुन सदर बाबत वारजे माळवाडी पोलीस ठाणेस गुरनं ३११/२०२४ अन्वये गुन्हा नोंद आहे. तसेच आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेल्या दोन दुचाकी व दोन्ही गुन्हयातील १) ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व २) १८ ग्रॅम वजनाची सोन्याची सोन्याची चैन जप्त करण्यात आलेल्या आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि मनोज बरुरे करीत आहेत.

सदरची कारवाई मा पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री संदिपसिह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीमती विजयमाला पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच मनोज बरुरे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार मयुर भोसले, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने व सागर मोरे यांनी केलेली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!