लैंगिक अत्याचारातील एकास १० वर्षांची सक्तमजुरी


बापूराव चौधरी पुणे प्रतिनिधी:- दि. २४ बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी शिरूर येथील बबलु उर्फ अमीर शब्बीर बाले (वय ३१) या आरोपीस दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा शिवाजीनगर सत्र न्यायालयाने ठोठावली. आरोपीवर १० हजारांचा दंडही लावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.

दुसरा आरोपी शब्बीर बाले हा न्यायप्रक्रियेपूर्वीच मृत्यूमुखी पडला होता. खटल्याचे कामकाज न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयात पार पडले. सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी काम पाहिल. तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान यांनी केला होता. कोर्ट पैरवीसाठी हवालदार बाळासाहेब गदादे, कॉन्स्टेबल रेणुका भिसे यांनी जबाबदारी पार पाडली. प्रभारी अधिकारी म्हणून निरीक्षक संदेश केंजळे कार्यरत होते. सत्र न्यायालयात कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत आणि जिल्हा कोटाचे पेरवी अधिकारी संतोष घोळवे यांचेही सहकार्य लाभले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!