अंमली पदार्थ विक्री करणा-या कडुन २१,३८,२००/- रू. कि. चे १०६ ग्रॅम ९१ मि.ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ केला जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड व अंमलदार हे भारती विदयापीठ पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक २९/०७/२०२४ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली कात्रज तलाव येथे दोन इसम एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करता येणार असल्याची बातमी मिळाली.

सदर बातमीवरुन अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील पोलीस निरीक्षक, पंडीत रेजितवाड, पोलीस उप-निरीक्षक, रामकृष्ण दळवी, दिगंबर चव्हाण व अंमलदार यांनी वरील परीसरात सापळा
लावला असता कात्रज तलाव चे गेट नं.१ समोर, कात्रज, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी येथे इसम नामे १) श्रवणसिंग बलवंतसिंग राजपुत, वय-२२ वर्षे, रा- तुळजाभवानी नगर, खराडी पुणे, मुळ रा-नयानगर ता-बुडा मलानी जि-बाडमेर, राज्य-राजस्थान, २) महेश पुनाराम विश्नोई वय-२० वर्षे, रा-तुळजाभवानी नगर, खराडी पुणे, मुळ गाव कुशलावा ता-फालोदी जि-जोधपुर, राज्य-राजस्थान हे त्यांची मोपेड घेवुन थांबलेले दिसले त्यांची झडतीमध्ये एकुण किं.रु. २२,५८,२००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये २१,३८,२००/- रू कि चे १०६ ग्रॅम ९१ मि.ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, ४०,०००/- रू कि ची मोपेड व ८०,०००/- रू किं चे दोन मोबाईल संच असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांनी त्याचेविरुध्द भारती विदयापीठ पोलीस ठाणे गु.र.नं. ६२८/२०२४ एन.डी. पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २२, (क) २९ अन्वये गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहे.

Advertisement

सदरील कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२, चे पोलीस निरीक्षक श्री पंडीत रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक, रामकृष्ण दळवी, पोलीस उपनिरीक्षक, दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार चेतन गायकवाड, रविन्द्र रोकडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, मयूर सूर्यवंशी, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदिप शेळके, नितीन जगदाळे, अझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!