रिक्षा चोरणाऱ्या आरोपीस फरासखाना पोलीस स्टेशन ने केले जेरबंद


पंकेश जाधव संपादक 7020794626

फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहर हद्दीत वाहनचोरीचे प्रमाण वाढल्याने सतर्क पेट्रोलिंग करून वाहनचोरी उघडकीस आनण्या बाबत मा पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी आदेशीत केले. त्या अनुषंगाने आज दि. 20/02/2024 रोजी फरासखाना पोलीस स्टेशन चे तपास पथकाकढील पोलीस अधिकारी व अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पो हवा प्रवीण पासलकर व पो हवा वैभव स्वामी यांना त्यांचे बतमीदारामार्फतीने बातमी मिळाली की दिनांक 15/02/2024 रोजी फरासखाना पोलीस स्टेशन गु र . क्र. 45/2024 भादवि कलम 379 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील रिक्षा क्र MH 12 CT 1678 ही RTO भागामध्ये फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने बातमीची खातरजमा करून मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो श्री प्रशांत भस्मे यांना कळवले असता त्यांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेणे बाबतचे आदेशीत केले. त्याप्रमाणे फरासखाना पो स्टे कढील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. वैभव गायकवाड, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, प्रमोद मोहिते, पो अंमलदार गणेश आटोळे, सुमित खुट्टे असे RTO परिसरात सापळा रचून थांबले असता एक इसम नमूद रिक्षा घेऊन जाताना दिसून आल्याने त्याला थांबवुन त्याला नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सचिन शरणआप्पा कसबे, वय – 43 वर्ष, रा. ताडीवाला रोड, पुणे असे असल्याचे सांगितले . त्यावर त्याला त्याच्या ताब्यात मिळालेल्या रिक्षा बाबत विश्वासात घेऊन विचारले असता त्याने सदर रिक्षा चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्याला ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्यात अटक करून त्याच्या ताब्यातुन 30,000/- रु किमतीची 1 चोरीची रिक्षा हस्तगत केली आहे.

Advertisement

सदरची उल्लेखनीय कामगिरी, माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त श्री प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम श्री प्रवीण पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 1 श्री. संदीप सिह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना श्रीमती रुक्मिणी गालंडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पो स्टे तपास पथक प्रभारी अधिकारी सहा. पो निरीक्षक श्री वैभव गायकवाड, पो. उप. नि. निलेश मोकाशी, स पो फौ रिजवान जिनडी, मेहबूब मोकाशी, पो हवा गणेश दळवी, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, प्रमोद मोहिते, पो अंमलदार गणेश आटोळे, सुमित खुट्टे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, संदीप कांबळे या पथकाने केलेली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!