अमंली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमास बिबवेवाडी पोलीसांनी केली अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदरबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २२/०८/२०२४ रोजी, सहा. पोलीस निरीक्षक श्री संजय निकुंभ, पोलीस उप निरीक्षक अशोक येवले व तपास पथकातील स्टाफ असे मा. वरिष्ठांचे आदेशान्वये बिबवेवाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने बिबवेवाडी पोलीस स्टेशचे हददीत पेट्रोलिंग करीत असताना पेट्रालिंग दरम्यान पोलीस अमंलदार अभिषेक धुमाळ यांना मिळालेल्या बातमीवरून १९/३० वा. चे सुमारास, नाज पान शॉप शेजारील गल्लीमध्ये, फाशी गेट चौक, गंगाधाम रोड पुणे येथे इसम नामे जुबेर ऊर्फ सुलतान लतीफ खान, वय २७ वर्षे, धंदा मजुरी, रा. अश्रफनगर गल्ली नं. ०७, कोंढवा पुणे. मुळ पत्ता- ग्राम-फकीरीबन खेड, तहसिल- उतरोला, जि. बलरामपूर राज्य उत्तरप्रदेश हा त्याचे ताब्यात किं.रु. ९५,४००/- रु चे ०५ ग्रॅम २७ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), कि.रु. १०,०००/- चा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट व इसम नामे स्वप्निल बापू शिंदे, वय-२८ वर्षे, काम-नोकरी, रा. लक्ष्मी नगर, लेन नं ८, कोंढवा बुद्रुक, पुणे, मुळ गाव. शेनवड, ता. वेल्हा, जि. पुणे हा त्याचे ताब्यात कि.रु. ६५,०००/- रु चे ०३ ग्रॅम २५ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.), कि.रु. ४०,०००/- चा एक अॅपल कंपनीचा आयफोन ११ मोबाईल हॅण्डसेट असा एकुण २,१०,४००/- रु किंमतीचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आलेने ते गुन्हयाचे जप्त करण्यात आलेले असून आरोपीविरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.२०२/२०२४ एन.डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीकडे तपासा दरम्यान सदर जप्त अंमली पदार्थ त्यांचा पाहिजे साथीदार नामे आसिफ ऊर्फ मुबासीर अन्सारी रा. कासेवाडी पुणे पुर्ण नाव पत्ता माहित नाही. याचेकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री मनोजकुमार लोंढे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त श्री आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मनोजकुमार लोंढे, सपोनि संजय निकुंभ, तपासपथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, पोलीस अमंलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, अभिषेक धुमाळ, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, नितीन कातुर्डे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!