मटका किंग नंदकुमार नाईक याचा जुगार अड्यावर पुणे शहर पोलिसांचा छापा; 8 जणांना अटक, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे शहरातील शुक्रवार पेठेतील शिवाजी रोड परिसरातील जनसेवा बिल्डिंगमधील चालू आसलेल्या जुगार अड्यावर छापा टाकून ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे . त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम व जुगाराचे साधनांसह २ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. काही दिवसांपूर्वी बंद झालेले जुगार अड्डे पुन्हा सुरु असल्याचे या कारवाईत दिसून येते आहे.

याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस हवालदार त्रिंबक बामगुडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदकुमार नाईक यांच्या पुणे शहरात अनेक ठिकाणी मटक्याचे अड्डे सुरु असलेल्याचे माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळाली.व शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालयाचे मागील जागेत मटका अड्डा सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट १ व युनिट २ च्या अधिकार्‍यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने येथे छापा घातला. तेव्हा तेथे कल्याण ओपन मटका जुगाराच्या चिठ्ठया दिल्या जात होत्या. त्यांच्याकडून मोबाईल, ९५ हजार ७४० रुपये रोख, जुगाराची साधने असा २ लाख ११ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम करीत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!