पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दरारा : अवैध धंदे ‘टोटल शट डाऊन’ : आढळल्यास ‘सर्जिकल स्ट्राईक’


महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार संभाळताच अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरॅथॉन बैठक घेत आपला दरारा दाखवून दिला. बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना हद्दीची इत्यंभूत माहिती विचारत फैलावर घेतले. तर काही अधिकाऱ्यांना हद्दीची माहिती सविस्तर देता न आल्याने ‘गोची’ झाली.

हद्दीतील अवैध धंदे कडेकोट बंद करण्याच्या सुचना देत अवैध धंदे आढळल्यास ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचे सूतोवाच अमितेश कुमार यांनी एका मुलाखतीत केले. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व्हिजिबल पोलिसिंग वाढविणे, पेट्रोलिंग गस्तीत अधिकाऱ्यांनी सहभाग घेणे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणे याविषयी सूचना केल्या. अमितेश कुमार यांनी नागपूर शहरातील मॅचफिक्सिंग, अवैध धंदे, गुन्हेगार यांचा बिमोड केला होता. पुण्यात देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करतील यात शंका नाही.

Advertisement

बैठकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिलांवरील अत्याचार, बाल गुन्हेगारी, शरीराविरुद्धचे गुन्हे थांबविण्यासाठी व्यापक उपाय योजना राबविण्यासाठी सूचना दिल्या.

बैठकीत आयुक्त अमितेश कुमार यांचा दरारा पाहून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना घाम फुटला. अनेकांनी बैठकीतूनच हद्द बंद आहे कि नाही याची शहनिशा केली असल्याचे सूत्रांकडून समजते. पोलीस आयुक्तांसमोर रेकॉर्ड ‘क्लीन’ ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कसोशीने प्रयत्न करतील यात शंका नाही


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!