मोक्का व दरोडयाच्या गुन्हयात दहा महिन्या पासुन फरार असलेला सराईत गुंड सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन जेरबंद
संपादक :- पंकेश जाधव 7020794626
सहकार नगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. २६/०६/२०२३ रोजी रात्री ०९.०० वा सुमारास फिर्यादी प्रविण विभीषण जाधव व त्याचे मित्र हे आण्णा भाऊ साठे वसाहत येथे थांबले असता, तेथे सिध्दार्थ गायकवाड, राजु उमाप व त्याचा मुलगा राम उमाप व त्यांचे इतर साथिदार है फिर्यादी जवळ आले. त्यावेळी त्यांचे हातात लोखंडी धारधार हत्यारे होती. सिध्दार्थ गायकवाड याने दत्ता जाधव यास तु प्रविण साथ देतो आहे. तुम्हा दोघांना व तुमच्या गंगला आम्ही बघुन घेतो. तुम्ही सुधरा नाहीतर एकएकाचा मर्डर करीन” अशी धमकी व ऋषिकेश मोरे यास शिवीगाळ करून सिध्या भाईच्या नादी लागलाय तु तुला भाई काय चिज आहे हे दाखवतो असे म्हणून सिध्दार्थ गायकवाड याने फिर्यादीस त्याचे हातातील लोखंडी हत्याराचा चाक दाखवुन फिर्यादी यांचे पॅन्टच्या खिश्यातुन बळजबरीने १,०००/- रूपये काढुन घेतले. या झटापटीत फिर्यादी यांचा टि शर्ट फाटला, त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १४५/२०२३, भारतीय दंड संहिता कलम ३९५,३२३,४५२,१४३,१४४,१४७,१४८,१४९, ४२७,५०४, ५०६, आर्म अॅक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५, मपोकाक. १४२ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्हया मध्ये सिध्दार्थ गायकवाड, राम उमाप, सनी परदेशी, अमोल बनसोडे, समीर शेख, व त्यांचे साथिदार असे एकुण १६ आरोपींना अटक करण्यात आली होती तर लखन खंडागळे हा गुन्हा झाले पासुन १० महिने फरार होता.
दि. ०६/०३/२०२४ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस ठाणे येथे हजर असताना असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मोका मध्ये फरार असलेला आरोपी नामे लखन खंडागळे हा आण्णाभाऊसाठे वसाहत सहकारनगर येथील अरण्येश्वर मंदीराजवळ मित्र भेटण्यासाठी येणार म्हणुन वाट पाहत थांबला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना कळविली असता त्यांनी लागलीच पोलिस उपनिरी, सुरज गोरे व अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकुन आरोपीस ताब्यात घेवून नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव बिपीन ऊर्फ लखन पंडीत खंडागळे वय ३३ वर्षे, रा.स.नं.१२. अशोक नगर लक्ष्मीनगर पोलीस चौकीजवळ येरवडा पुणे असे सांगितले असुन त्याच्याकडे सहकारनगर पोलीस ठाणे येथे गुरनं १४५/२०२३ दाखल गुन्हयाच्या अनुशंगाने विश्वसात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार सिध्दार्थ गायकवाड, राम उमाप, सनी परदेशी, अमोल बनसोडे यांच्यासह केल्याचे कबुल केल्याने
त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी याच्यावर जबरी दुखापतीचा ०१ गुन्हा येरवडा पोलीस स्टेशन येथे दाखल आहे. सदर आरोपीस मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष मोक्का न्यायाधीश) पुणे यांचे न्यायालयात हजर केले असता नमुद आरोपीस दि.१२/०३/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी सोो करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग श्री प्रविणकुमार पाटील सोा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील सोा, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी धग्यानी सोा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, सहा पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, संजय गायकवाड, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, निलेश शिवतारे, विशाल वाघ, सागर सुतकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

