दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ ची दमदार कारवाई ! मोटार सायकल चोरस केले जेरबंद … 


पंकेश जाधव संपादक 7020794626

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ पुणे शहर                                         

 महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ३१/०३/२०२४ रोजी मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये पोहवा ५४५ गायकवाड, पोशि ८७३२ कारके, पोशि ८३८३ दगडे असे वाहनचोरी प्रतिबंधक चे अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त करीत असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की, दोन इसम हे पेटकर यांचे मोकळे मैदान म्हातोबानगर सुतारदरा कोथरूड, पुणे येथे एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकलसह उभे असुन सदरची मोटर सायकल ही चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बाबत मा. वपोनी सो यांना कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने वरील नमुद स्टाफ असे सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता नमूद दोन्ही इसम मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे पत्ते अ.क्र. १) अमीर हुसेन बाशा खान, वय- २१ वर्ष, रा. कीर्ती गार्डन, प्रथमेश वाईन शॉप समोर बाणेर पाषाण सुस रोड, पुणे मुळगाव- हालीपीठ, शहापूर, ता. यादगिर, जि. कर्नाटक

Advertisement

२) विधीसंघर्ष सदरची मोटर सायकल ही त्याचा साथीदार विधीसंघर्ष ग्रस्त बालक याचे सोबत मिळून चोरी केल्याचे सांगितले. त्याचे ताब्यात मिळून आलेल्या मोटर सायकलबाबत व कागदपत्रांबाबत चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने व कागदपत्रे न दाखवल्याने तसेच सदर मो/सा च्या मुळ मालकाचा शोध घेणे असल्याने त्यास *सी.आर. पी. सी. कलम ४१(१)(ड)* अन्वये ताब्यात घेऊन अटक करुन अटक मुदतीत त्याचेकडून खालील नमूद पो स्टे कडील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) चतुर्शृंगी पो स्टे, गु र नं. ९११/२०२३, भा. दं. वि. कलम ३७९ (डुप्लिकेट नंबर – एम.एच.२९/यू/०३०९ व मुळ गाडी नं – एम.एच. १२/ए. के./५२९२)

२) हिंजवडी पो स्टे, गु र नं. ४०४/२०२४,भा. दं. वि. कलम ३७९ ( एम.एच. १२/एम. सी./८०७१)

असे एकूण ०२ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून किं. रू. २०,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाई करिता चतुर्शृंगी पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच विधीसंघर्ष ग्रस्त बालक यास त्याचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री. शैलेश बलकवडे, अपर पो. आयुक्त सो, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री. अमोल झेंडे, पो उप आयुक्त सो, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री. सुनील तांबे, सहा पोलीस आयुक्त सो, गुन्हे १, पुणे शहर व मा. श्री. रंगराव पवार सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. बाळू गायकवाड, पो.अं. साई कारके, श्रीकांत दगडे, पोना रवींद्र लोखंडे, पो. अं. सुमित ताकपेरे व पो. हवा. गणेश ढगे यांनी कारवाई केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!