वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखाची दमदार कामगिरी! दुचाकी चोरणा-या दोन इसमांकडून एकूण ०६ मोटार सायकली जप्त….
हमीदा शेख पुणे प्रतिनिधी
वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा याकरीता मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार असे कोथरुड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि नं २८८/२०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना स्टाफमधील पोलीस अंमलदार १००१९ सुमित ताकपेरे, पोलीस अंमलदार ८७४२ महेश पाटील व पोलीस अंमलदार ८३८३ श्रीकांत दगडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराने बातमी दिली की,वर नमुद गुन्ह्यातील दुचाकी चोरी करणारे दोन इसम हे वारजे ब्रिज जवळील चर्च जवळ, पुणे येथे थांबले असुन त्यांचेजवळ एक काळया व राखाडी रंगाची YAMAHA FZ मॉडेलची मोटार सायकल असुन सदरची मोटार सायकल ही चोरीची असलेबाबत बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन वर नमुद इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे, पत्ते १) कार्तिक दत्तात्रय दळवी, वय २० वर्षे, रा. त्रिमुर्ती फ्लेक्स प्रिटींगच्या पाठीमागे, शिळीमकर यांचे घराजवळ, मु.पो. पौड, ता. मुळशी, जि. पुणे. २) दिगंबर ऊर्फ दिनु अंकुश आंबे, वय २६ वर्षे, रा. दिगंबर नाथ तरुण मंडळ, सचिन शेंडकर यांच्या रुममध्ये पौड पोलीस स्टेशनजवळ, पौड, पुणे व मुळपत्ता चाल नं बी ११३, अप्पर इंदीरानगर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे सदर मोटार सायकलीचे कागदपत्रांबाबत चौकशी करता ते उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने व त्यांनी सदर मोटार सायकलीचे कागदपत्र न दाखविल्याने सदर गाडीचे चासिस नं व इंजिन नं वरुन माहिती काढली असता सदर गाडीबाबत फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नं १८५/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद असलेबाबत माहिती समजल्याने सदर इसमांकडे अधिक चौकशी करता त्यांनी आणखी काही मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना कोथरुड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि नं २८८/२०२३, भादंवि कलम ३७९ या दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन त्यांचेकडुन खालील नमुद पोलीस स्टेशनकडील एकुण ०६ वाहनचोरीचे गुन्हे
उघडकीस आणले आहेत.
१) कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नं. २८८/२०२३ भादंवि कलम ३७९
२ ) फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नं. १८५/२०२३, भादंवि कलम ३७९
३) खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि.नं. २९०/२०२३, भादंवि कलम ३७९
४) खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नं. ७३/२०२२, भादंवि कलम ३७९
५) हवेली पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण, गुन्हा रजि.नं. ९१/२०२२, भादंवि कलम ३७९ ६) कॅम्प पोलीस स्टेशन, अहमदनगर, गुन्हा रजि. नं. १३७/२०२३, भादंवि कलम ३७९
वरील नमुद आरोपीकडुन पुणे शहरचे ०४ व पुणे ग्रामीण कडील ०१ व बाहेरील जिल्ह्याकडील ०१ असे एकुण ०६ वाहनचोरीये गुन्हे उघडकीस आणुन त्यांचेकडुन र्कि रु १,४०,०००/- या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन उर्वरित मोटार सायकलीबाबत अद्याप तपास चालु आहे.तसेच दाखल गुन्ह्याचा पुढील तपास ए.एन.येडे, पोलीस हवालदार ७६०८, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १. गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त साो, श्री. रितेशकुमार, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) व अतिरिक्त कार्यभार पोलीस सह आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा. श्री अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ मा. श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलीस हवालदार आजीनाथ येडे, बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, मॅगी जाधव, गणेश ढगे, पोलीस नाईक रविंद्र लोखंडे, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील, श्रीकांत दगडे, साईकुमार कारके, शिवाजी सातपुते व नारायण बनकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

