महाळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई मौजे खराबवाडी ता. खेड जि पुणे येथे दरोडा टाकुन ट्रक व त्यातील माल चोरुन नेणा-या टोळीला महाळुंगे एमआयडीसी पोलीसांनी १२ तासात • ठोकल्या बेडया ट्रकसह ३७,००,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल केला जप्त


प्रणव ओव्हाळ पुणे शहर प्रतिनिधी

महाळुगे एमआयडीसी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ३०/११/२०२३ रोजी २३:३० ते दिनांक ०१ / १२ / २३ रोजीचे ०४:०० बाचे पुर्वी मौजे खराबवाडी ता खेड जि पुणे येथील इंडीयन ऑईल पंपाजवळ ट्रक नंबर एम एच ०९ / एफ. एल /८१९१ यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज महाळुंगे येथील प्लॅस्टिक दाना असलेले ८०० बॅग भरुन ते फरसुंगी पुणे येथे खाली करण्यासाठी जात असताना मौजे खराबवाडी ता खेड जि पुणे येथील इंडीयन ऑईल पंपाजवळ गाडी बाजुस उभी करुन चालक काही वेळ आराम करीत असताना त्याचे ट्रकमध्ये काही इसम जबरदस्तीने शिरुन चालकाचे तोंडावर चापटी मारुन हाताने मारहान करुन चालकाचे तोंडावर टॉवेल टाकुन त्यांचे ताब्यातील प्लॅस्टिक दान्याचे बॅग भरलेला ट्रक जबरदस्तीने चालवित नेवुन चालकाचे जवळील रोख रक्कम ३०००/- व त्याचा मोबाईल फोन व सदरचा माल भरलेला ट्रक काढुन घेवुन चालकास तळेगाव पोलीस स्टेशनचे जवळ अनोळखी रस्त्यावर सोडुन दिल्याने चालक नामे फिर्यादी विजय तुकाराम पिंगळे वय ५२ वर्षे धंदा चालक राहणार मु.पो. माळवाडी (लाटे) तालुका बारामती जिल्हा पुणे याने ५ ते ६ अज्ञात इसमाविरुध्द फिर्याद दिल्याने महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८११ / २०२३ भादवि कलम ३९५ प्रमाणे अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असुन सदरबाबत मा. पोलीस आयुक्त सेवा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना सीसीटीव्ही, तांत्रिक गोष्टी व गुप्त बातमीदारा मार्फत आरोपीचा शोध घेवून तात्काळ गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.

दाखल गुन्हयाचे तपासामध्ये वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी मा… वरीष्ठांच्या सुचना व आदेशाप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केल्यावर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू केला असता पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी यांना त्यांचे विश्वसनीय गुप्त बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली सदरचा गुन्हा इसम नामे १) भारत आनंदा सारवे, वय २३ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, रायगड बिल्डींग फ्लॅट नं ३१२, महाळुंगे इंगळे, ता खेड जि पुणे मुळ रा. मसोला पो. भानसरा ता. आरणी जि. यवतमाळ २) सागर यशवंत पाटील, वय २४ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, गुलमोहर बिल्डींग फ्लॅट नं ३०६, महाळुंगे ता खेड जि पुणे मुळ रा. शेवगे बुद्रुक, ता. पारोळा जि जळगाव ३) संतोष ऊर्फ दाजी विठ्ठल काळे, वय २९ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, रायगड बिल्डींग फ्लॅट नं ३१२, महाळुंगे ता खेड जि पुणे, मुळ रा. दोंदे ता खेड जि पुणे ४) निरंजन राजेंद्र पाटील वय २१ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, गुलमोहर बिल्डींग फ्लॅट नं १३०६, महाळुंगे ता खेड जि पुणे मुळ रा. शेवगे बुद्रुक, ता. पारोळा जि जळगाव ५) आशिष ऊर्फ बबलु वसंत आडे, वय २८ वर्षे, रा. सध्याचा पत्ता विकास गायकवाड यांच्या रुममध्ये चिंबळी फाटा, ता खेड जि पुणे मुळगाव रा. कवडीपुर पो. पारडी ता पुसद ता – यवतमाळ ६) विकास सुखलाल पवार वय २२ वर्षे रा. म्हाडा कॉलनी, आंबेली बिल्डींग, ६ वा मजला, महाळुंगे ता खेड जि पुणे मुळ रा. बोयेतांडा, वसंतवाडी ता पारोळा जि जळगाव यांनी केला आहे. अशी बातमी मिळताच तपास पथकांच्या वेगवेगळया टिम तयार करुन आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ३०,००,०००/- रुपये किंमतीचा एक ट्रक व ८०० प्लास्टीक दाण्याच्या गोण्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

दाखल गुन्हयातील अटक आरोपींची नावे :

भारत आनंदा सारवे, वय २३ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, रायगड बिल्डींग फ्लॅट नं ३१२, महाळुंगे इंगळे, ता खेड जि पुणे मुळ रा. मसोला पो. भानसरा ता. आरणी जि. यवतमाळ २) सागर यशवंत पाटील, वय २४ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, गुलमोहर बिल्डींग फ्लॅट नं ३०६, महाळुंगे ता खेड जि पुणे मुळ रा. शेवगे बुद्रुक, ता. पारोळा जि जळगाव ३) संतोष ऊर्फ दाजी विठ्ठल काळे, वय २९ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, रायगड बिल्डींग फ्लॅट नं ३१२, महाळुंगे ता खेड जि पुणे, मुळ रा. दोंदे ता खेड जि पुणे ४) निरंजन राजेंद्र पाटील वय २१ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, गुलमोहर बिल्डींग फ्लॅट नं १३०६, महाळुंगे ता खेड जि पुणे मुळ रा. शेवगे बुद्रुक, ता. पारोळा जि जळगाव ५) आशिष ऊर्फ बबलु वसंत आडे, वय २८ वर्षे, रा. सध्याचा पत्ता विकास गायकवाड यांच्या रुममध्ये चिंबळी फाटा, ता खेड जि पुणे मुळगाव रा. कवडीपुर पो. पारडी ता पुसद ता – यवतमाळ ६) विकास सुखलाल पवार वय २२ वर्षे रा. म्हाडा कॉलनी, आंबेली बिल्डींग, ६ वा मजला, महाळुंगे ता खेड जि पुणे मुळ रा. बोयेतांडा, वसंतवाडी ता पारोळा जि जळगाव­ जप्त मुद्देमाल १) १७,००,०००/- रुपये किंमतीचा एक ट्रक त्याचा नंबर एम एच ०९ एफ एल ८१९१ २) २०,००,०००/- रुपये किंमतीच्या ८०० गोण्या प्लॅस्टिक दाणा३७,००,०००/- रुपये किंमतीचा व वर्णनाचा

 

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे मा.अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप-आयुक्त श्री संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजेंद्रसिंग गौर याचे सुचना व मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री वसंतराव बाबर,पोलीस निरीक्षक (गुन्हे) सतोष कसबे, पोलीस उप-निरीक्षक विलास गोसावी, पो.हवा. राजेंद्र कोणकेरी,अमोल बोराटे, युवराज बिराजदार, विठ्ठल वडेकर, संतोष होळकर, तानाजी गाडे, राजु जाधव पो. ना. संतोष काळे, किशोर सांगळे पो.कॉ शिवाजी लोखंडे, गणेश गायकवाड, राजेंद्र खेडकर, बाळकृष्ण पाटोळे, अमोल माटे, राहुल मिसाळ, शरद खैरे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक, विलास गोसावी, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!