ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेणारी टोळी खंडणी विरोधी पथक १ च्या जाळ्यात


पंकेश जाधव संपादक 7020794626

खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांच्या आदेशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार कोथरूड भागात पेट्रोलिंग करत असताना सपोफौ प्रविण ढमाळ व पौहवा / अमोल आवाड यांना भुसारी कॉलनी येथील पटेल टेरेस या सोसायटीमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली. सदर बातमीची पडताळणी करून मा. वरिष्ठांच्या परवानगीने पटेल टेरेस, फ्लॅट नं.५. मुसारी कॉलनी, कॉथरूड येथे सापळा रचून आरोपी नामे १) मुकेशकुमार शैलेंद्रप्रसाद साहू वय २४ वर्षे २) देवेंद्र कमलेशकुमार यादव वय २१ वर्षे ३) जसवंत भुषणलाल साहू वय २२ वर्षे ४) राहूलकुमार गणेश यादव वय ३० वर्षे ५) रोहितकुमार गणेश यादव वय २६ वर्षे ६) दुष्यंत कोमलसिंह सोनकर वय २३ वर्षे ७) संदिप राजु मेश्राम वय २१ वर्षे ८) आखिलेश्वर कृपाराम ठाकूर वय २४ वर्षे ९) मोहम्मद ममनुन ईस्माईल सौदागर वय ३२ वर्षे सर्व रा. भिलाई, छत्तीसगड १०) अमित कैलास शेंडगे वय ३२ वर्षे रा.स.नं.१२० किश्किंदानगर, पॉड रोड, संदिप सायकल मार्टजवळ, कोथरुड, पुणे असे एकूण १० आरोपींना ताब्यात घेवून १६ मोबाईल व २ लॅपटॉप असा एकूण २,२०,५००/- रू किं चा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्याविरूद्ध सपोफौ प्रविण ढमाळ यांचे फिर्यादी वरून कोथरूड पो. ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास खंडणी विरोधी पथक १ चे रापोनि अभिजीत पाटील हे करत आहेत.

Advertisement

 

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री.अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त १. गुन्हे श्री. सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे क्रांतीकुमार पाटील यांच्या सुचनेप्रमाणे सपोनि अभिजीत पाटील, पोउपनिरी यशवंत ओंबासे, पोलीस अंमलदार प्रविण ढमाळ, अमोल आवाड, मधुकर तुपसौंदर, संजय भापकर, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार व संभाजी गंगावणे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!