छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथील बंदीस्त शिक्षाबंदी व न्यायाधीन बंद्यांना त्यांचे नातेवाईक आणि वकील यांच्याशी संवाद साधता यावा, याकरिता “अॅलन स्मार्ट कार्ड योजना


पंकेश जाधव संपादक 7020794626

छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 16.04.2024 रोजी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथील बंदीस्त शिक्षाबंदी व न्यायाधीन बंद्यांना त्यांचे नातेवाईक आणि वकील यांच्याशी संवाद साधता यावा, याकरिता “अॅलन स्मार्ट कार्ड योजना” सुरु करण्यात आली असुन सदर योजनेतुन या कारागृहातील 650 बंद्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करुन देण्यात आलेले असुन उर्वरित बंद्यांना देखील लवकरात लवकर स्मार्ट कार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर योजनेव्दारे बंदयांचा त्यांचे कुटुंबीय व नातेवाईक तसेच वकील यांच्याशी संपर्क तुटु नये, व बाहेर समाजात घडणारे बदलापासुन ते वंचित राहु नये म्हणुन ही सुविधा त्यांच्यासाठी सुरु करण्यात आली आहे. बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर आपले कुटुंबाचे जीवनप्रवाह व न्यायालयीन प्रक्रिया बाबतची माहिती त्यास जलद गतीने सदर फोन सुविधेमुळे ज्ञात होणार आहे. बरेच बंदयांचे नातेवाईक खुप दुर असल्यामुळे आर्थिक परिस्थिती अथवा ईतर कारणामुळे मुलाखतीस येवू शकत नाही, अशा नातेवाईकांना या योजनेचा खुप मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. या योजनेमध्ये प्रत्येक बंदयांला स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्यात आलेली आहे.

Advertisement

सदर ”अॅलन ग्रुप फोन सुविधाचे’ चे उदघाटन दिनांक 16.04.2024 रोजी मा.श्री. यु.टी. पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे शुभ हस्ते व मा. श्री.एन.जी. सावंत, अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह तसेच अधिकारी/कर्मचारी व बंदी यांचे उपस्थित संपन्न झाले. कारागृहातील बंदयांसाठी “अॅलन ग्रुप फोन सुविधा” हा स्तुत्य उपक्रम मा.श्री. अमिताभ गुप्ता (भा.पो.से) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. डॉ. जालिंदर सुपेकर, (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक, (कारागृह) महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संकल्पनेतुन व मा.श्री. यु. टी. पवार, कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!