इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन उत्साहात; तळेगाव दाभाडे नगर परिषदेत पुष्पांजली व शपथविधी
पुणे प्रतिनिधी श्रावणी कामत
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- तळेगाव दाभाडे :नगर परिषद कार्यालयात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बुधवाल दिं १९ नोव्हेंबर २०२५रोजी त्यांना अभिवादन करण्यात आले. आस्थापना प्रमुख नेहा पाटील यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्या म्हणून इंदिरा गांधी यांच्या कार्याचा या वेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
कार्यक्रमानंतर राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सर्व उपस्थितांनी एकात्मतेची शपथ घेतली. देशातील विविधतेतून एकता आणि सामाजिक सौहार्द वाढविण्याचा संकल्प या शपथविधी दरम्यान करण्यात आला. नगर परिषदेच्या सर्व विभागांमध्ये एकात्मता आणि सौहार्दाचे मूल्य रुजावे, यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.
यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे, सुनिल काळकुटे, भास्कर वाघमारे, वैशाली आडकर, ज्योती पेंडसे, कर संकलन लिपिक प्रविण माने, प्रफुल्ल गलीयत, विलास वाघमारे, आदेश गरुड, विशाल लोणारे, बुद्धभूषण काकडे, बाळासाहेब पवळे, मुकादम पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे, संदीप भुम्बक, संध्या गायकवाड, मयुरी आडोळे आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नगर परिषदेच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशाची ऐक्यभावना टिकवून ठेवण्याच्या भावनेने सर्व कर्मचारी व पदाधिकारी एकत्र आले होते. विविधतेतून एकता या भारतीय मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प या उपक्रमातून अधोरेखित झाला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

