चांपा येथे घरफोडी; दीड लाखाचा ऐवज लंपास
अरुण हरडे नागपूर ब्युरो चिफ
Advertisement
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन नागपूर :- चोरट्याने घरफोडी करीत १ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांपा येथे शनिवारी मध्यरात्री घडली असून, रविवारी सकाळी उघडकीस आली. तुषार जुगलकिशोर तिवारी (२७, रा. चांपा, ता. उमरेड) यांच्या घरी कुणीही नसल्याचे पाहून चोरट्याने दाराचे कुलूप तोडले व आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. त्या दागिन्यांची एकूण किंमत १ लाख ४३ हजार रुपये असल्याने तुषारने पोलिसांना सांगितले.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

