लाडकी बहीण योजनेचे कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे कंटाळून महिलेने गळफास घेऊन केलीआत्महत्या.


अरुण हरडे नागपूर ब्युरो चिफ

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन नागपूर :– लाडकी योजनेला लागणाऱ्या कागदपत्रे पुराव्यांची पुर्तता व योजनेला असलेल्या मुदतीत करु शकत नसल्याने मी लाडकी बहीण योजनेतुन दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपये लाभापासून वंचित राहणार तर नाही ना या चिंतेमुळे दिनांक ३/७/२४ रोजी खैरी येथील कलावती लक्ष्मण बुरडकर वय ५८ वर्ष या महिलेने शेतातुन मंजुरी करुन आल्यावर सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Advertisement

सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळतात खैरी बिट जमदार रमेश आत्राम, अविनाश चिकराम, हे घटनास्थळी पोहचुन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आला. व पुढील तपास करीत आहे. ( लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी मुदतीची अटच कशाला ? अनेक महिला या सासरी आहे, तर अनेक महिला निरनिराळ्या कारणांमुळे बाहेरगावी आहे

त्यामुळे लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी मुदत दिल्याने काही महिलांचे कागदोपत्री पुरावे हे लवकरच होणार असे नाही . त्यामुळे महिला चिंतातुर होऊन यापलीकडे पण अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही मारेहचा अहेर की बहिणीच्या गळ्यात असलेला गळफास असे परीसरात नागरिकांचे म्हणणे होत असल्याच्या चर्चा गावागावात दिसुन येत आहे.)


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!