तांदुळवाडी चे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांचे दुःखद निधन
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचे ज्येष्ठ नेते, माजी सरपंच, मार्केट कमिटी इस्लामपूरचे माजी सदस्य, शिवाजी हायस्कूल घुणकीचे माजी मुख्याध्यापक तानाजीराव शामराव पाटील (दादा) यांचे वार्धक्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना-नातवंडे व इतर नातेवाईक असा मोठा परिवार आहे. लोकनेते राजारामबापूंच्या वेळी राजकीय प्रवासात दादांनी केलेली भाषणे आजही लोक विसरलेली नाहीत. दादा भाषणासाठी उभे राहिले श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. तांदुळवाडी गावच्या विकासामध्ये दादांनी भरीव कामगिरी केले आहे. त्यांच्या जाण्याने पाटील कुटुंबियावर व तांदुळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. रक्षाविसर्जन बुधवार, दि. 15. जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता आहे. दशक्रियाविधी 11 वाजता, कार्यविधी 12 वाजता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकाच दिवशी तांदुळवाडी येथे होणार आहेत

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

