धक्कादायक घटना ! पुणे गोळीबाराने हादरलं, मित्रानेच केला मित्राचा खून
सागर कसबे पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यू ऑनलाईन पुणे : पुण्यात गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. कारण पिंपरी चिंचवड शहर आज गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. पिंपरी चिंचवडच्या चऱ्होली अलंकापुरम चौकाजवळ गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती. पण आता आलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती आता समोर येत आहे. या गोळीबारात एक ते दोन राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. या गोळीबारात नितीन गिलबिले नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे नितीन गिलबिले यांच्या मित्रांनीच त्यांना संपवल्याची माहिती आता समोर येत आहे. मित्रांनी मित्राच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली आहे. ही घटना आळंदी दिघी रोडवर घडली आहे. नितीन गिलबिलेंचा जागीच मृत्यू झाला आहे. संशयित आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूरचा शोध दिघी पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहाच्या सुमारास मयत नितीन गिलबिले, अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे आळंदी दिघी रस्त्याच्या कडेला चारचाकी गाडी लावून आत बसले होते. ते एकमेकांसोबत गप्पा मारत होते. त्यापैकी, अमित पठारे आणि विक्रांतने त्यांच्या जवळील पिस्तूल काढून नितीन गिलबिलेंच्या डोक्यात गोळी झाडली. यात नितीनचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. संशयित आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर पसार झाले आहेत. त्यांचा शोध दिघी पोलीस घेत आहेत. घटनास्थळी दिघी पोलीस आणि गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी धाव घेतली होती. अद्याप हत्येचं कारण समजू शकलेलं नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
गोळीबारामागील कारण काय?
जागेच्या प्लॉटिंगच्या व्यवसायाच्या कारणामुळे हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतक नितीन गिलबिले आणि आरोपी मित्र अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तीनही मित्र जमिनीच्या प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. याच व्यवसायामधील व्यवहाराच्या वादातून हा गोळीबार केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

