गुन्हे शाखा, युनिट २ ची दमदार कामगिरी ! रेकॉर्डवरील सराईत आरोपीकडुन ०४ पिस्टल व ०५ काडतुसे गुन्हे शाखा, युनिट २, पिंपरी चिंचवड यांनी केली जप्त


अमोल कुंटे पुणे प्रतिनिधी
गुन्हे शाखा, युनिट २, पिंपरी चिंचवड शहर
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त साो, पिंपरी चिंचवड, श्री. विनय कुमार चौबे साो, यांनी सर्व पोलीस ठाणे आणि सर्व गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांना दिनांक ११/११/२०२५ रोजी पासुन अवैद्ध अग्नीशस्त्र (आर्म ड्राईव्ह) बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आमचे व सपोआ, गुन्हे-१, विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ पिपरी चिंचवडचे वपोनि, अरविंद पवार, पोउपनि मयुरेश साळुंखे, श्रेणी पोउपनि दिपक खरात, सपोउपनि/प्रविण दळे, नितिन ढोरजे पोहवा/कुणाल शिंदे, पोशि/प्रशांत सैद, पोशि/अमर राणे, पोशि/सुखदेव गावंडे, पोशि/ रवि पवार असे गुन्हे शाखा युनिट-२ चे हद्दिमध्ये अवैद्ध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांबाबत माहिती काढत असताना पोशि/अमर राणे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हे बोडकेवाडी फाटा, हिंजवडी-माण रोड, पुणे परिसरात येणार असुन त्यांचे कडे अवैद्ध अग्नीशस्त्र आहेत अशी बातमी मिळाली. तेव्हा वरील पथकाने आरोपी नामे १) प्रविण गुळेश्वर अंकुश वय २१ वर्षे रा. शनि नगर, लाईटचे टॉवर शेजारी, कात्रज, पुणे २) विकी दिपक चव्हाण, वय २० वर्षे, रा. स्टेनोस पी जी हिंजवडी फेस २ विप्रो सर्कल हिंजवडी पुणे ३) रोहीत फुलचंद भालशंकर वय २२ वर्षे रा. दुधाने यांचे रुममध्ये राज वाशिग सेंटर शेजारी सिहगडरोड जाधवनगर वडगाव // पुणे यांना दि. १२/११/२०२५ रोजी शिताफीने ताब्यात घेवून त्यांचे कडुन ०४ पिस्टल व ०५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
आरोपींचे रेकॉर्ड खालील प्रमाणे
१) प्रविण गुंडेश्वर अंकुश वय २१ वर्षे रा. शनि नगर, लाईटचे टॉवर शेजारी, कात्रज, पुणे
१) घाटकोपर पो ठाणे, गु.र.नंबर-२४/२०२३ मा.द.वि.क-३६३,३५४ सह कलम-८,१२ पोस्को
२) विकी दिपक चव्हाण, वय २० वर्षे, रा. स्टेनोस पी जी हिंजवडी फेस २ विप्रो सर्कल हिंजवडी पुणे
१) हिंजवडी पो ठाणे, मु.र.नंबर-१०२२/२०२५ आर्म अॅक्ट ३(२५)
2) रोहीत फुलचंद भालशंकर वय २२ वर्षे रा. राज वाशिंग सेंटर शेजारी सिंहगडरोड जाधवनगर वडगाव बु// पुणे
१) हिंजवडी पो ठाणे, गु.र.नंबर-१०/२०२४ आर्म अॅक्ट ३(२५)
२) खडक पी ठाणे, मु.र. नंबर-११०/२०२५ बी. एन. एस १३७ (२) ६४ पोरको ४, ८, १२
३) शिरुर पो ठाणे, गु.र.नंबर-२४२/२०२३ भा.दं.वि.क- ३७९
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनय कुमार चौबे सो, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड सो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी पवार, सपोआ, गुन्हे-१ मा. श्री. विशाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-२, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोउपनि मयुरेश साळुंखे, श्रेणी पोउपनि दिपक खरात, सपोउपनि संजय गवारे, प्रविण दळे, नितिन बोरजे, पोहवा/कृणाल शिंदे, पोहवा/तुषार शेटे, पोहवा मोहम्मद गौस नदाफ, पोहवा/भाऊसाहेब राठोड, पोहवा/विक्रम कुदळ, पोहवा/बाबा चव्हाण, पोहवा/अली शेख, पोहवा/कृष्णा शितोळे, पोशि/प्रशांत सैद, पोशि/सुखदेव गावंडे, पोशि/अमर राणे, पोशि/दिनकर आडे, पोशि/रवि पवार, पोशि/ धनंजय जाधव यांनी केली आहे.

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!