महिला व मुली यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिंजवडी मध्ये पोलीस मदत केंद्र सुरू.


डॅनियल ॲनथोनी पुणे ब्युरो चीफ

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- हिंजवडीतील महिला व मुली यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे .महिला व मुली यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे ,त्यामुळे अडचणीत असलेली महिला अथवा मुली यांना तत्काळ मदत मिळणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हिंजवडी परिसर हा आयटी कंपन्यांनी व्यापलेला आहे या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी देशातून पुरुषाबरोबर महिला व मुली कर्मचारी मोठ्या संख्येने येत असतात या सर्व महिला व मुली तसेच येथील सोसायटीमध्ये राहत असलेले रहिवासी यांच्या सुरक्षेची नैतिक जबाबदारी ही संबंधित पोलीस यंत्रणा यांची असते.
या सर्व गोष्टीचा विचार करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि या ठिकाणी पोलीस मदत केंद्र सुरू केले ,त्यामुळे रात्री अपरात्री उशिरापर्यंत काम करणारे महिला व मुली कर्मचारी वर्ग यांच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे

हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत विप्रो सर्कल फेज०२,परिसरातील आयटी कंपन्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे याशिवाय उंच उंच इमारतीचे इमले देखील उभे राहत आहेत ,या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पोलिसांनी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे .पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते गुरुवार (ता.१७)रोजी या पोलीस मदत केंद्राचे औपचारिक उद्घाटन झाले.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड ,सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे,यांच्यासह ॲमबेसी टेक्सझोन कंपनीचे पदाधिकारी विविध कंपन्या प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
पोलीस मदत केंद्र बाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले ,की या पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस स्टाफ हजर असणार आहेत ,तसेच फेज ०२,भागात पोलिसांची सतत गस्त राहणार आहे .त्यामुळे कंपनी स्टाफ व परिसरातील नागरिक यांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी मदत होणार आहे .

सदर पोलीस मदत केंद्र उभारण्याकरता ॲम्बेसी टेक झोन या कंपनीचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!