अंमली विरोधी पथक ०२ ची दमदार कामगीरी ! गांजा विक्री करणारे इसम जेरबंद
पंकेश जाधव संपादक 7020794626
अंमली विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा, पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अमली पदार्थ अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे शेल पेट्रोलपंप रोड लोणीकाळभोर पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे. सदर ठिकाणी जाऊन पंचासमक्ष कारवाई केली असता इसम नामे १) सुमेर सादीक तांबोळी, वय २६ वर्षे, रा. जयभवानीचौक, बुरडगल्ली, ता. सांगोला, जि. सोलापुर, व २) विकास बाळु बनसोडे, वय ३४ वर्षे, रा.भिमनगर, सांगोला, सोलापुर यांच्या ताब्यात ३८ किलो ८७० ग्रॅम गांजा तसेच इतर ऎवज संगणमताने, अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं.४४१/२०२४, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार युवराज कांबळे, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदिप जाधव, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

