पुणे शहर पोलीस दलातील खडक दामिनी पथकातील महिला कर्मचारी निवेदिता यादव यांना राज्यस्थरीय “लोक गौरव” पुरस्कार प्रदान. 


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- शहर पोलीस दलातील खडक दामिनी पथकातील महिला कर्मचारी निवेदिता यादव यांना राज्यस्थरीय “लोक गौरव” पुरस्कार प्रदान. दामिनी पथकात काम करताना पुणेकरांची सेवा व त्यांना मदत करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

खडक पोलीस दलातील दामिनी पथकातील महिला कर्मचारी निवेदिता यादव यांना राज्यस्थरीय“लोक गौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दामिनी पथकात काम करताना पुणेकरांची सेवा व त्यांना मदत करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. स्वप्नल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षी विविध क्षेत्रात काम केलेल्या ७१ महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Advertisement

पुणे शहर पोलीस दलातील दामिनी पथकाच्या निवेदिता यादव यांची यंदाच्या राज्यस्थरिय“लोक गौरव”पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांना निवृत्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

खडक पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी निवेदिता यादव या दामिनी पथकात नेमणुकीला आहेत. चार महिन्यापासून त्या काम करतात. हद्दीत महिलांची व बालकांच्या सुरक्षेतेविषयी जनजागृती करत असतात. FFCP – मुस्कान संस्थेमार्फत ते शाळांमध्ये मुलांसाठी ते सुरक्षित व असुरक्षित स्पर्श बद्दल जनजागृती सत्र घेतात. बाल लैंगिक अत्याचार प्रकरण मध्ये लोहियानगर परिसरात त्यांनी लहान मुलींवर झालेला प्रकार उघडकीस आणला होता. याप्रकरणी आरोपीवर पॉस्कोनुसार गुन्हा नोंद करून कारवाई केली होती.

सातत्याने नागरिकांना हवी तेव्हा मदत करणे व महिलांची सुरक्षा यासाठी काम करतात. यासोबतच महिला जनजागृती पर कार्यक्रम, महिला कायदे आणि छेडछाडी संदर्भात वेळोवेळी आयोजित करतात.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!