वयोवृध्द महिलेच्या गळयातील सोन्याची कंठी जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेणा-या आरोपी आरोपीस सहकारनगर पोलीसांनी केली अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे शहर
महा पोलीस न्यूज! ऑनलाईन पुणे:- दि.२९/०९/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वा.चे सुमारास यातील फिर्यादी महिला वय ७९ वर्षे रा. संभाजीनगर धनकवडी पुणे हया त्यांचे राहते घराचे लिप्ट जवळ आल्या असता त्यांची ७५,०००/- रुपये किमतीची १४ ग्रॅम वजनाची सोन्याची कंठी जबरदस्तीने हिसका मारुन तोडुन महिला नामे दिपा राहुल चव्हाण वय ३४ वर्षे रा. बालाजीनगर धनकवडी पुणे हीने चोरी केली. तीला फिर्यादी यांनी प्रतीकार केला असता दिपा चव्हाण हीने त्यांचे हाताला चावा घेतला व त्यांना जोराचा धक्का देवुन खाली पडले त्यामध्ये फिर्यादी यांना पायाला व हाताला लागुन जखमी झाल्या. त्यावेळी त्यांनी आरडा ओरडा केल्याने त्यांचे नातेवाईकांनी दिपा चव्हाण हिला जागेवरच पकडले. लागलीच पोलीस सदर ठिकाणी गेले व सदर महिलेस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणले. ताबे महिलेची अंगझडती घेता त्यामध्ये फिर्यादी यांची चोरीस गेलेली वरील वजनाची व किमतीची सोन्याची कंठी मिळुन आली. सदर बाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने स.नगर पोलीस स्टेशन गु.र.नं.३१८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्हयात १) दिपा राहुल चव्हाण हिला अटक केली आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्रीमती नंदीनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार सुभाष घाडगे, रविंद्र कदम, बजरंग पवार, अमोल पवार, चंद्रकांत जाधव, किरण कांबळे, महेश मंडलीक, सागर सुतकर, सागर कुंभार विशाल वाघ, अमीत पदमाळे, खंडु शिंदे, महेश भगत महिला पोलीस अंमलदार वनिता रामगुडे, राहीणी डोंगरे, सीमा कांबळे, राधा साळवे, मीरा किंद्रे, कोमल सावंत यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

