दिवसा व रात्री घरफोड्या करणा-या अट्टल गुन्हेगारास कोंढवा पोलीसांकडुन अटक”


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- शहरात सध्या दिवसा वर रात्री होणाऱ्या घरफोड्यांच्या अनुषगांने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार पोहवा /११६१ सतिश चव्हाण, पोहवा/६९५१ विशाल मेमाणे, पोहवा/७९ निलेश देसाई, पोना/८४८६ चिनके, पो. अं./८५९१ होळकर, व पो.अं./४७९ शाहिद शेख, पो.अं. / २१८५ मदन, पो.अं./४९० सुरज शुक्ला व पो.अं./१०११६ सागर भोसले असे कोंढवा पोलीस स्टेशन अभिलेखावरील दिवसा दाखल झालेल्या घरफोडी गुन्ह्यांचा तपास करत असताना सीसीटीव्ही व गुप्त बातमीदाराच्या मदतीने अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना धांडेकरनगर, येवलेवाडी येथे रात्री झालेल्या घरफोडीच्या गुन्हयाचा तपासात करित असताना सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने कोंढवा पोस्टे तपास पथकातील पो.अं. / ८५९१ होळकर, पो.अं./२१८५ मदन, पो.अं./४९० सुरज शुक्ला व पो.अं./१०११६ सागर भोसले यांनी घटनास्थळाचे आजु बाजुचे तसेच आरोपी येण्या जाण्याचे
रस्त्याचे असे मिळून १४० ते १५० सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी केली असता सदर सी.सी.टी.व्ही. फुटेज मध्ये दोन इसम त्यांच्याकडील पल्सर दुचाकी गाडीवरून जाताना दिसून आले. सदर सी.सी.टी.व्ही. फुटेज मध्ये दिसणारे इसम कोण आहेत याची त्यांच्या प्राप्त सी.सी.टी.व्ही. फुटेज मधिल फोटोच्या सहाय्याने माहिती घेत असताना, पो. अं. / ८५९१ होळकर, व पो.अं. / २१८५ मदन, पो.अं./१०११६ सागर भोसले व पो.अं. /४९० सुरज शुक्ला यांना माहिती प्राप्त झाली की सदरचा गुन्हा हा आरोपी नामे अतुल चंद्रकांत आमले, रा. तिरूपती नगर, विश्वकर्मा मंदिर समोर, जकात नाका जवळ, वारजे, पुणे याने व त्याच्या साथीदाराने केलेला आहे. दि. २८/०६/२०२४ रोजी सायंकाळी १७:०० वा चे सुमारास आम्ही पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोहवा/११६१ सतिश चव्हाण, पोहवा/६९५१ विशाल मेमाणे, पोहवा/७९ निलेश देसाई, पोना/८४८६ चिनके, पो. अं. / ८५९१ होळकर, व पो.अं./४७९ शाहिद शेख, पो.अं./२१८५ मदन, पो.अं. /४९० सुरज शुक्ला व पो.अं./१०११६ सागर भोसले, पोलीस अंमलदार/९८३८ संतोष बनसुडे असे ट्रॅप लावून आरोपीचे घराचे परिसरात विभागुन थांबलो असता आरोपी त्याच्याकडील काळ्या लाल रंगाच्या पल्सर दुचाकी गाडीवरून त्याचे घराचे दिशेने जात असताना दिसून आल्याने त्यास सोबतच्या पोलीस स्टाफ करवी काही अंतरावर थांबवून त्यास कोंढवा पोस्टे येथे आणुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अतुल चंद्रकांत आमले, वय २६ वर्षे, रा. तिरूपती निवास, तिरूपतीनगर, सिद्धेश्वर नगर, विश्वकर्मा मंदिर समोर, आकाशनगर जकात नाका जवळ, वारजे, पुणे. सदर आरोपी याच्याकडे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील व पुणे शहरातील घरफोडी गुन्ह्यांच्या अनुषगांने संखोल व कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने धांडेकर नगर येवलेवाडी, कोंढवा येथे रात्री तसेच काही दिवसापुर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन भिलारेवाडी व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील झिल कॉलेज चौक येथे दिवसा घरफोडी केल्याची कबुली देवून खालील तिन गुन्ह्यातील १ लाख ५६ हजार रू किंमतीचे ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व ९० हजार रू किंमतीची एक पल्सर दुचाकी असा एकुण २ लाख ४६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या अटक आरोपी विरूध्द वयाच्या १३ वर्षापासुन ते आज पर्यंत पुणे शहर व पुणे ग्रामीण तसेच शेजारील जिल्हयांमध्ये असे एकुण सुमारे ३५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आम्ही आरोपीताकडुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत.

Advertisement

१) कोंढवा पोलीस ठाणे कडील गुरन. ७२४/२०२४, भा.दं. वि. कलम. ४५४,३८०
२) भारतीविद्यापीठ पोलीस ठाणे गुरन. ५१६/२०२४, भा.दं. वि. कलम. ४५४,४५७,३८० ३) सिंहगड रोड पोलीस ठाणे गुरन. ३१७/२०२४, भा.दं. वि. कलम. ४५४,४५७,३८०

वरिल नमुद कारवाई मा. अमितेशकुमार साो, पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील, साो अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५, मा. गणेश इंगळे साो सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., कोंढवा पोलीस स्टेशन, श्री मानसिंग पाटील, मा. पोलीस निरीक्षक साो., गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार/६९५१ विशाल मेमाणे, पोलीस हवालदार/७९ निलेश देसाई, पोलीस हवालदार/११६१ सतिश चव्हाण, पोलीस नाईक /८४८६ गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार/८५९१ लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार/४७९ शाहीद शेख, पोलीस अंमलदार/९८३८ संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार/२१८५ सुजित मदन, पोलीस अंमलदार/१०११६ सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!