भारती विदयापीठ भागात धडक कारवाई करुन ५६,९०,०००/- रु किंमतीचा अफिम हा अंमली पदार्थ जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२, गुन्हे शाखा
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- मा. पोलीस आयुक्त यांनी पुणे शहरातील अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिले असून त्या अनुषंगाने आज दि.२८/०९/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अधिनस्त पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीनुसार १०/४५ वा आंबेगाव, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे देविलाल शंकरलाल आहीर, वय ४२ वर्ष रा. कात्रज, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण ५६,९०,०००/- रु.कि.चा २ किलो ८४५ ग्रॅम अफिम हा अंमली पदार्थ तसेच माल लपविण्याकरीता वापरलेली अॅक्टीव्हा गाडी व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, संदिप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

